CAA वरून अमित शहांना ‘जमीयत उलेमा ए हिंद’ची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून सध्या देशभर असंतोष निर्माण झालाय. अनेक राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये निदर्शने होत असून त्याला हिंसक वळण मिळत आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापलेय. असे असताना पश्चिम बंगालचे मंत्री आणि जमीयत उलेमा-ए-हिंदचे प्रदेशाध्यक्ष सिद्दिकउल्ला चौधरी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना थेट धमकीच दिली आहे.

अमित शहा यांनी हे वादग्रस्त CAA विधेयक मागे घ्यावे. ते जोपर्यंत CAA मागे घेणार नाहीत तोपर्यंत त्यांना कोलकात्यात पाय ठेवू देणार नाही असे चौधरी यांनी म्हटलं आहे. जौधरींच्या या धमकीमुळे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. चौधरी म्हणाले CAA विधेयक हे घटनाविरोधी आहे. त्यामुळे गरीब आणि मुस्लिमांच्या अधिकारांवर गदा येणार आहे. त्यामुळे हे विधेयक तातडीने मागे घेतले पाहिजे.

चौधरी पुढे म्हणाले, अमित शहा हे जर कोलकाता भेटीवर येणार असतील तर त्यांना विमानतळाच्या बाहेर पडू दिले जाणार नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आधीच या विधेयकाला तीव्र विरोध केला असून पश्चिम बंगालमध्ये हे विधेयक लागू केले जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/