CAA हिंसा : योगी सरकारची मोठी कारवाई, AMU च्या 10 हजार ‘अज्ञात’ विद्यार्थ्यांवर FIR दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशमधील अलिगड मुस्लिम विद्यापीठात हिंसाचार झाला. त्याचबरोबर या हिंसाचार प्रकरणात योगी सरकारने AMUच्या 10 हजार अज्ञात विद्यार्थ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 15 डिसेंबर रोजी अलिगड मुस्लिम विद्यापीठाने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात हिंसक निदर्शने केली.

योगी सरकारची कारवाई –

यूपी पोलिस नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये हिंसक आंदोलनांवर कारवाई करीत आहेत. 15 डिसेंबर रोजी एएमयूमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. निदर्शनाने हिंसक वळण घेतले होते. यावेळी काही जणांनी एएमयू गेटही तोडला. यूपी पोलिस आणि AMU विद्यार्थी संघटनेत आरोप-प्रत्यारोपही झाले.

विद्यार्थी संघटनेने सांगितले की, पोलिसांनी अतिरेकी कृत्य केले. निदर्शकांना नियंत्रित करण्यासाठी पोलीसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलिस जखमी झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे. यूपीमधील निदर्शने व गोंधळानंतर शांततेचे वातवरण निर्माण होत आहे. नागरिकांनी अफवांकडे लक्ष देऊ नये तसेच शांतता राखावी असे यूपी पोलिसांनी आवाहन केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/