राहुल आणि केजरीवाल ‘जुळे’ भाऊ ! जे कुंभ मेळ्यात हरवले अन् शाहीन बागमध्ये भेटले : BJP

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) विरोधात दिल्लीमधील शाहीनबाग येथे चालू असलेल्या निदर्शनाला घेऊन भाजपाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. भाजपा प्रवक्ता संबित पात्रा म्हणाले की शाहीनबागच्या माध्यमातून जी अराजकता पसरवण्यात येत आहे त्यामागे दोन जुळे भाऊ आहेत ते म्हणजे राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल, असे ते म्हणाले.

संबित पात्रा यांनी बुधवारी देखील काँग्रेस वर हल्ला केला होता. ते म्हणाले की काँग्रेस वोटबँकचे राजकारण करत आहे आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) ला घेऊन लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. पात्रा म्हणाले की, “आम्हाला काँग्रेसला विचारायचे आहे की सीएएच्या आडून हिंदूंना शिवी का दिली जात आहे.”

तसेच पात्रा म्हणाले की, शाहीनबाग मध्ये छोट्या छोट्या मुलांना देखील कट्टरतेचे धडे शिकवले जात आहेत. हा कोणता विरोध आहे. पात्रा यांनी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांना देखील उत्तर देताना म्हटले की “आमच्या पूर्वजांनी देशाला सहिष्णू बनवले.” असदुद्दीन ओवैसीचे लहान भाऊ अकबरुद्दीन ओवैसी एका जाहीर सभेत म्हटले होते की मुस्लिमांनी ८०० वर्षांपर्यंत देशावर राज्य केले, लालकिल्ला देखील त्यांनीच बनवला. ओवैसी हिंदू समुदायाला म्हणाले होते, ‘तुमच्या बापानी काय केले?’

शाहीनबागेत सीएए विरोधात कित्येक दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. हा कायदा मागे घेण्यात यावा अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. दुसरीकडे, सरकारने स्पष्ट केले आहे की सीएए कोणत्याही किंमतीवर मागे घेणार नाही. या कायद्याचा निषेध करण्यासाठी अनेक काँग्रेस नेत्यांनी शाहीनबागला भेट दिली आहे. या नेत्यांमध्ये शशी थरूर, मणिशंकर अय्यर आणि दिग्विजय सिंह यांचा समावेश आहे. तथापि, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी अजून भेट दिलेली नाही.

फेसबुक पेज लाईक करा – 

 

You might also like