पुण्यात पिस्तूल लावून कॅबचालकाचे अपहरण, हातपाय बांधून फेकले शेतात, कार घेऊन चोरटे पसार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लक्ष्मीनारायण थिएटर चौकात प्रवाशांची वाट पाहात थांबलेल्या कारचालकाला पिस्तूलाचा धाक दखवून कारमध्ये चौघांनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला य़वत येथे नेऊन हात पाय बांधून एका शेतात फेकून त्याची एक्सेंट कार घेऊन पोबारा केला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रमोद बबन पाटोळे (वय ३१ रा. ताथवडे) यांनी फिर्याद दिली असून ६ अनोळखी व्यक्तींविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद पाटोळे हे कॅब चालवतात. शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ते स्वारगेट य़ेथील लक्ष्मीनारायण चौकात त्यांची हुंदाई एक्सेंट कार घेऊन प्रवाशांची वाट पाहात उभे होते. त्यावेळी चारजण तेथे आले. त्यातील एकाने पाटोळे यांना पिस्तूलाचा धाक दाखवला आणि ते जीवे मारण्याची धमकी देत तिघांनी डोक्याला मागे बंदूक लावून गाडीत कोंबले. त्यानंतर त्यातील एकजण कार चालविण्यास बसला. काही वेळाने कार कदमाक वस्ती येथे गेली. त्यावेळी कारमध्ये आणखी दोघे बसले. त्यांनी पाटोळे यांचे हात पाय बांधून यवत येथे एका शेतात टाकून दिले. त्यानंतर त्यांची कार घेऊन तेथून पोबारा केला.