संतापजनक ! महिला वकिल जात होती न्यायालयात, कॅब ड्रायव्हरनं समोरच केलं ‘हस्तमैथुन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वजनिक ठिकाणी महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतु आता राजधानी दिल्ली-एनसीआरमधील कॅब ड्रायव्हर्सही महिलांना टार्गेट करत आहेत. असेच एक ताजे प्रकरण हरियाणामधील गुरुग्राममध्ये घडले आहे. जेथे एका महिला वकिलाने कॅब चालकावर आपल्यासमोर हस्तमैथुन केल्याचा आरोप केला आहे. घडलेल्या घटनेची माहिती देताना पीडित महिला वकिलाने सांगितले की, तिने गुरुग्रामहून दिल्ली उच्च न्यायालयात येण्यासाठी मोबाईल अ‍ॅपद्वारे टॅक्सी बुक केली होती. कॅबमध्ये बसल्यानंतर ड्रायव्हर सतत आरशातून त्यांच्याकडे पहात होता आणि त्यांनतर ड्राईव्हिंग करताना त्याने हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली.

25 वर्षीय महिलेने सांगितले की ती गाडीच्या मागील सीटवर बसली होती आणि कॅबचालक तिला मागील व्यूव्ह आरशाद्वारे सतत पहात होता. महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले पण त्यानंतर ड्रायव्हरने तिच्या समोरच हस्तमैथुन सुरू केले. हे पाहून तिला खूप भीती वाटली पण शांतपणे गाडीत बसून राहिल्याचे या महिलेने सांगितले.

दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर कॅबमधून खाली उतरल्यानंतर महिलेने 100 नंबरवर पोलिसांना बोलावून आपली तक्रार नोंदविली. जरी त्या महिलेने सांगितले की कार चालविणाऱ्या व्यक्तीने तिचा विनयभंग केला नाही, परंतु तो अश्लील कृत्य करीत होता. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अ‍ॅपच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवरून चालकाला शोधून काढले आणि त्याला अटक केली आणि गाडी ताब्यात घेतली.

You might also like