कॅब चालकाचा गळा आवळून खून, आरोपींना गुजरात मधून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कात्रज -कोंढवा रोडवरील आईएमडी स्कुलसमोरील एका मैदानात त्यांनी ओला कॅबचालकाचा गळा आवळून खुन केला. त्यानंतर चोरटे कॅब घेऊन पळून गेले. सकाळी पोलिसांना मृतदेह आढळून आला. दुपारी तो मृतदेह ओला कॅबचालकाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

हल्लेखोरांनी खुन करुन गाडी चोरून नेली तरी त्यावरील जीपीएस यंत्रणा सुरु होती. पोलिसांनी त्याद्वारे शोध सुरु केला. तोपर्यंत ते गुजरातमध्ये पोहचले होते. कोंढवा पोलिसांनी गुजरात पोलिसांना सांगून गाडी व त्यातील दोघांना अवघ्या काही तासात ताब्यात घेतले. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पुण्यातून पोलिसांची टीम रवाना झाली आहे.

सुनिल रघुनाथ शास्त्री (वय ५२,रा. लोहगाव) असे खून झालेल्या ओला चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा कात्रज रोडवरील आईएमडी स्कुलसमोरील मैदानात सकाळी फिरायला आलेल्या लोकांना एक मृतदेह पडला असल्याचे आढळून आले. त्यांनी कोंढवा पोलिसांना याची माहिती दिली. सुनिल शास्त्री हा ओला चालक असून प्राथमिक माहितीनुसार त्यांचा गळा आवळून खुन करण्यात आला. त्यानंतर मृतदेह या ठिकाणी टाकून देण्यात आला होता. यावेळी कॅब चालकाची गाडी देखील जागेवर नसल्याने गाडीची चोरी करण्यासाठी तर त्याचा खून करण्यात आला नसेल ना या दिशेने तपास करण्यात येत आहे.

शास्त्री हे पूर्वी गोखलेनगर येथे रहायला होते. गोखलेनगरमध्ये त्यांनी तीन मजली इमारतही बांधली होती. त्यानंतर ते लोहगाव येथे रहायला गेले होते. त्यांच्या कॅबला जीपीएस यंत्रणा होती. संशयितांनी शास्त्री यांचा खुन केल्यानंतर मृतदेह टाकला व गाडी पळवून नेली. मात्र, त्यावरील जीपीएस यंत्रणा तशीच चालू असल्याने पोलिसांनी त्याद्वारे माग काढला. तेव्हा ती गुजरातमध्ये आढळून आली. गुजरात पोलिसांशी संंपर्क साधून गाडीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना पुण्यात आणल्यानंतरच खुनामागील नेमके कारण समजू शकणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पांढरे केस काळे करा, मध आणि लसूण आहे रामबाण औषध

महिलांनो, आकस्मिक गर्भपात झाल्यास अशी घ्या काळजी

सावधान ! पाय दुखणे हा असू शकतो हार्ट अ‍ॅटॅकचा संकेत

सावधान ! मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकतो ‘ब्रेन कँन्सर’