राज्यात CAB लागू करण्याबाबत ‘या’ पक्षाच्या भुमिकेमुळं नव्या सरकारपुढे पेच !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा केंद्र सरकारने लोकसभेत मांडला होता. मात्र बऱ्याच विरोधनांतरही हे विधेयक मंजूर करण्यात आले. तरी हा कायदा राज्यात लागू करायचा का नाही, यावरून महाविकासआघाडी सरकारपुढे संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या नव्या कायद्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट करत हा कायदा राज्यात लागू न करण्याचा निर्णय घेतला. पण दुसरीकडे शिवसेनेने या विधेयकच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे, आता शिवसेनेपुढे पेच निर्माण झाला आहे.

बंगाल, केरळ आणि पश्चिम पंजाब या राज्यांत भाजप सत्तेवर नाही. तेथील सरकारने हे विधेयक लागू न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात देखील या कायद्याची अंमलबजावणी न करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की, ‘हे विधेयक संविधानावर आधारित नाही. काँग्रेसने यापूर्वीच याला विरोध केला आहे.’ दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील आम्ही आमची भूमिका सांगू असं थोरात यांनी यावेळी सांगितलं.

काही दिवसांपूर्वीच नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी संमत केलं. राष्ट्रपतींची त्यावर सही करत तो कायदा म्हणून लागू करण्यात आला. मात्र, आता या कायद्याची अंमलबजावणी करायची की नाही, हे राज्याच्या हातात आहे.

दरम्यान, लोकसभेत काँग्रेसने या विधेयक मान्य केले नव्हते तर, शिवसेना खासदारांनी विधेयकाच्या बाजूने कौल दिला होता. मात्र शिवसेनेच्या या भूमिकेवर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर शिवसेनेने राज्यसभेत या बिलावर काही ही सूचना सुचवल्या होत्या. या सूचनांची अंमलबजावणी केली नाही म्हणून विधेयक मंजूर करताना राज्यसभेतील शिवसेनेचे खासदारांनी सभात्याग केला. मात्र, आता हे विधेयक महाविकासआघाडीतीलहे तीनही पक्ष एकत्रित असलेल्या महाराष्ट्रात लागू होणार का यावर जोरदार चर्चा आहे.

काँग्रेसचे नेत्यांनी संबंधित विधेयकाला विरोध आहे, तर दुसरीकडे शिवसेनेने या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे शिवसेना कोंडीत सापडली आहे. त्यामुळे आता राज्यातली महाविकासआघाडी CAB वर काय निर्णय घेते हे पाहून उत्सुकतेचं ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/