कोबीचे ‘हे’ 10 आरोग्यदायी फायदे माहितीयेत का ?

चायनीज आणि फास्टफूडमध्ये कोबीचा वापर होऊ लागल्यानंतर आता कोबी न आवडणारे लोकही कोबी आवडीनं खाताना दिसत आहेत. कोबीचे शरीराला अनेक गुणकारी फायदे होतात. परंतु याबद्दल खूपच कमी लोकांना माहित आहे. कोबीच्या सेवनानं अनेक लहान मोठे आजारही दूर होतात. आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) कोबीत अ जीवनसत्व आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतं. यामुळं कोबी हा शरीरासाठी गुणकारी आहे. यामुळं आतड्याचा कर्करोग नियंत्रणात राहू शकतो.

2) कोबीत अँटीऑक्सिडंट, जीवनसत्वे आणि खनिजे यांचं प्रमाण जास्त असतं. पत्ताकोबीचं रोज सेवन केलं तर सी जीवसत्वाची 50 टक्के गरज पूर्ण केली जाऊ शकते.

3) रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

4) कोबीमुळं मज्जातंतू आणि मेंदूचं कार्य व्यवस्थित रहातं.

5) कफ झाल्यास कोबीची भाजी नक्की खावी. कोबीमुळं कफ पातळ होतो.

6) पोट साफ रहाण्यासाठी खूप मदत होते.

7) पचनक्रिया सुरळीत राहते.

8) बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

9) प्रसुती झालेल्या मातेला दूध कमी येत असेल तर कोबीचा आहारात समावेश करावा.

10) कोबी खाल्ल्यामुळं डोळ्यांच्या तक्रारी दूर होतात.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.