‘स्तनपाना’मुळं उद्भवणाऱ्या स्तनांच्या प्रत्येक समस्यांवर उपयुक्त आहे कोबी ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – आईचं दूध हे प्रत्येक बाळासाठी अमृत असतं. परंतु स्तनपान देणाऱ्या महिलांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे स्तनांमध्ये वेदना आणि सूज. स्तनांशी संबंधित अशा समस्यांवर आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) मॅसिटायटीस (स्तनदाह) – 70 टक्के महिलांना आयुष्यात कधीतरी स्तनांचा त्रास होतो. मासिक पाळी, संसर्ग, जळजळ आणि स्तनपान ही मुख्य कारणं आहेत. अनेक महिलांच्या स्तनाग्रात बाळाला स्तनपान दिल्यानंतर चीरा पडतात. यामुळं जीवाणू स्तनात प्रवेश करतात. स्तनातील उतींमुळं जळजळ होते आणि संसर्ग होतो. या स्थितीला मॅसिटायटीस म्हणजेच स्तनदाह म्हणतात. यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे आईचं बऱ्याच दिवसांनी बाळाला दूध पाजणं आहे. स्तनांना थोडाही आराम न मिळाल्यानं हा त्रास उद्भवतो. परंतु या समस्येवर कोबीचा औषध म्हणून वापर करून त्यावर मात केली जाऊ शकते.

मॅसिटायटीससाठी असा करा कोबीचा वापर
– कोबीची स्वच्छ, कोरडी आणि थंड पानं घ्या.
– ही पानं स्तनांवर लावा
– स्तन कोबीच्या पानांनी पूर्णपणे झाका आणि गरम होईपर्यंत ठेवा. जर स्तनांमध्ये वेदना किंवा रक्तस्त्राव असेल तर तो भाग झाकू नका.
– 20 मिनिटांसाठी हा उपाय करा आणि नंतर पानं काढून टाका. गरज असेल तर हलक्या हातांनी स्तन धुवू शकता.
– एकदा वापरलेली कोबीची पानं पुन्हा वापरू नका.
– जर तुम्ही स्तनपान करणं थांबवलं असेल तर तुम्ही दिवसातून तीनदा 20-20 मिनिटांसाठी हा उपाय करू शकता.

2) स्तनामधील दूध सुकण्यावर उपाय
स्तनपान थांबवल्यानंतरही अनेक स्त्रियांच्या स्तनांमध्ये दूध तयार होण्याची प्रक्रिया होत राहते ज्यामुळं त्यांना त्रास होतो. ही समस्या देखील कोबीच्या वापरानं दूर केली जाऊ शकते. मॅसिटायटीसप्रमाणे या समस्येवरही कोबीचा फायदा मिळतो. या प्रक्रियेमुळं काही दिवसात स्तनांमधून येणारं दूध थांबेल.

3) स्तनांमधील वेदना आणि सूज यावर चांगला उपाय
ब्रेस्ट एगॉर्जमेंटच्या समस्येसाठी कोबीचा वापर हा एक उत्कृष्ट उपाय आहे. काही संशोधनात असं आढळलं आहे की, कोबीची पानं स्तनांवर लावल्यामुळं स्तनांचा त्रास आणि कडकपणा कमी होतो. या उपायामुळं महिलांना कोणताही त्रास न होता बराच काळ आपल्या बाळाला स्तनपान देता येतं. कोबीच्या वापरामुळं स्तनांचा कर्करोग होण्याचा धोकाही कमी होऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like