शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आराखड्यास मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. या योजनेला महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे नाव देण्यात आले. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आराखड्यास मंजूरी देण्यात आली.

कोणाला मिळणार लाभ
1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्जखात्यात अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाच्या पुनर्गठीत कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम 2 लाखापेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास दोन लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

Farmer Loan Waiver

कोण असेल योजनेसाठी पात्र
शेतकऱ्यांचे अल्प, अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज तसेच अल्पमुदत पीक कर्जाची पुनर्गठीत, फेर पुनर्गठीत कर्ज या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत.

‘या’ कर्जदारांसाठी नवी योजना
सरकारने दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले आहे आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आणि व्याज 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत असेल किंवा परतफेड केली नसेल आणि खात्यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त रक्कम असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवी योजना आणण्याच सरकार प्रयत्न करणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार लवकरच नवीन योजना जाहीर करणार आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/