4 कोटी SC विद्यार्थ्यांना मोदी सरकारचं गिफ्ट ! 59 हजार कोटींच्या स्कॉलरशिपला मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 59 हजार कोटी रुपयांच्या पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशिप योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळानं बुधवारी मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत 4 वर्षात 4 कोटी एससी विद्यार्थ्यी आणि विद्यार्थिनींना फायदा मिळणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी याबाबत माहिती दिली.

थावरचंद गेहलोत यांनी सांगितलं की, पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशिप योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 59 हजार कोटी रुपयांची तरतूद असून यातील 35 हजार 534 कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करेल. इतर निधी राज्य सरकारकडे सोपवण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा एससी प्रवर्गातील 4 कोटी विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणार आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही मंत्रिमंडळ बैठकीनंतर निर्णयाची माहिती दिली. यात देशात डीटीएच सेवा देण्यासाठी निर्णयांमध्ये संशोधनाला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आता 20 वर्षांसाठी जारी करण्यात आलेल्या डीटीएस लायसन्ससाठीचं शुल्क हे 3 महिन्याला घेण्यात येईल.