शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने (Modi Government) बुधवारी शेतकर्‍यांच्या (Farmers,) हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कॅबिनेटने DAP फर्टिलायजरवर सबसिडी (Subsidy) रेटवर 700 रुपये प्रति बॅग वाढ केली आहे. आता डीएपीच्या प्रति गोणीची किंमत 2400 रुपये असेल. यापूर्वी ती शेतकर्‍यांना 500 रुपये प्रति बॅग सबसिडी मिळत होती. सबसिडीमध्ये केलेल्या या वाढीमुळे सरकारी तिजोरीवर 14,775 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार वाढणार आहे. अशी माहिती केमिकल्स आणि फर्टिलायजर राज्यमंत्री मनसुख मांडविया (Minister of State Mansukh Mandvia) यांनी दिली आहे.


काय होता प्रस्ताव?

यूनियन कॅबिनेटने फर्टिलायजर विभागाच्या त्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे ज्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशआधारित फर्टिलायजरचा न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी रेट वाढवण्याची शिफारस केली होती. ही शिफारस 2021-22 साठी करण्यात आली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत (Press conference) मनसुख मांडविया (Mansukh Mandvia) यांनी म्हटले की, यापूर्वी केंद्र सरकारने (Central Government) नॉन-यूरिया फर्टिलायजरच्या (Non-urea fertilizer) सबसिडीमध्ये कपात केली होती. यामुळे कोरोना (corona) महामारीच्या काळात या आर्थिक वर्षात सरकारी तिजोरीवरील 22,186.55 कोटी रुपयांचा भार कमी झाला होता.

फर्टिलायजरवर सबसिडी 18.78 रु कमी
फर्टिलायजर मिनिस्ट्रीने आपल्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटले होते की.
सध्याच्या आर्थिक वर्षासाठी नायट्रोजन आधारित फर्टिलायजरवर सबसिडी कमी करून 18.78 रुपये प्रति किलोग्रॅम आणि फॉस्फरस आधारित फर्टिलायजरवर 14.88 रुपये प्रति किलोग्रॅम केली आहे.
अशाप्रकारे पोटॅशवर प्रति किलो सबसिडी कमी करून 10.11 रुपये प्रति किलोग्रॅम केली होती तर सल्फरवर प्रति किलोग्रॅम सबसिडी 2.37 रुपये ठरवली होती.
2019-20 साठी नायट्रोजनसाठी प्रति किलोग्रॅम सबसिडी 18.90 रुपये, फॉस्फरससाठी 15.21 रुपये, पोटॅशसाठी 11.12 रुपये ठरवली होती.
अशाच प्रकारे सल्फरची प्रति किलोग्रॅम सबसिडी 3.56 रुपये केली होती.

Wab Title :- cabinet approves additional 14775 cr rupees for fertiliser subsidies check details varpat

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये