मोदी सरकारचा ‘कडक’ कायदा, आता कुठलीच ‘स्पॉंजी’ तसेच ‘चिटफंड’ कंपनी तुमचे पैसे बुडावणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक रक्कम जमा करण्यास सांगणाऱ्या योजना आणि चिंट फंड्समध्ये गुंतवणूक करुन आपले कष्टाचे पैसे बुडाल्याचा अनुभव अनेकदा अनेकांना आला असेल. परंतू आता यावर रोख लावण्यासाठी केंद्र सरकारने कायदा आणला आहे, ज्यामुळे अशा कोणत्याही योजनेत गुंतवणूक केल्यास तुमची कष्टाची कमाई बूडणार नाही. यासाठी सरकारने द बँनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉजिट स्कीम बील २०१९ आणले आहे.

यानुसार आता देशातील सर्व अवैध जमा योजनांची तपासणी करण्यात येणार आहे जे गरीबांच्या, निरक्षर वर्गातील लोकांच्या आणि सामान्य लोकांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारतात.

the banning of unregulated deposit schemes bill 2019 ने देशात सुरु असलेल्या अवैध डिपॉजिटच्या योजनावर लगाम लागणार आहे. जे अवैध डिपॉजिट स्कीम गैर फायदा उचलून सामान्य लोकांचे पैसे हडप करतात त्यांच्यावर आता सरकार बंधन आणणार आहे. याचा उद्देश्यच मुळात अवैध पद्धतीने रक्कम जमा करणाऱ्या योजनांना बंद करणे. या कायद्यातून अशा घोटाळेबाज कंपन्यावर बंधन येणार आहे.

काय आहे ही योजना
जर कोणतीही डिपॉजिट टेकिंग योजना बील मधील यादीतील नियंत्रकाकडे नोंदणीकृत नसेल तर ते अनियंत्रित समजण्यात येईल. पोंजी स्कीम म्हणजेच खोटे गुंतवणूक व्यवहार. ज्यात योजना चालक जुन्या गुंतवणूकदारांना नव्या गुंतवणूक दारांनी जमा केलेले परतावा देतो. या अशा योजना असतात ज्यात खरंतर कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करण्यात आलेली नसते. जेणे करुन गुंतवणूकीतून नफा मिळवून ते ग्राहकांना परतावा करत असतात. तर यात दुसऱ्या व्यक्तीकडून घेण्यात आलेला पैसा तिसऱ्या व्यक्तीला रिटर्न मध्ये देण्यात येत असतात. या साखळी पद्धतीमुळे अनेकांचे पैसे यात बुडतात. इटलीचा एक व्यवसायिक अशीच एक योजना चालवत होता आणि त्याने त्यात घोटाळा करुन लोकांना डूबवले. त्यानंतर अशा खोट्या योजनांना पोंजी स्कीम नाव पडले.

काय होणार परिणाम
या बिलाला परवानगी मिळाल्यानंतर आता अवैध डिपॉजिट योजना चालवून गरिबांची कष्टाची कमाई लूटणाऱ्यांवर आता बंधन येणार आहे. या बीलात शिक्षेची तरतूद देखील करण्यात आली आहेत. अशा योजनेत बेकायदा डिपॉजिट जमा करण्यात येते आणि त्यानंतर काही काळाने डिपॉजिट रक्कम परत करण्यात येते. परंतू या खोट्या योजनावर आता बंधन येणार आहेत.

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय