मोदी सरकारकडून लाखो शेतकर्‍यांना मोठं गिफ्ट ! व्याजावरील सबसिडीची ‘सूट’ आणखी वाढवली, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना आता स्वैच्छिक बनवला आहे. याशिवाय उत्तर ईशान्य भारतातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा 90 टक्के प्रीमियम सरकार देणार आहे. कॅबिनेटने व्याज सहायत्ता योजनेचा लाभ 2 टक्क्यांवरुन 2.5 टक्के करण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. सरकारच्या या निर्णयाचा 95 लाख शेतकऱ्यांना लाभ होईल. कॅबिनेट बैठक संपल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधित माहिती दिली.

5.5 कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा –
पत्रकार परिषदेत कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, या योजनेचा लाभ 5.5 कोटी शेतकऱ्यांनी घेतला आहे. या योजनेतंर्गत 13,000 कोटी रुपयांचा विमा एकत्रित झाला. यापूर्वी 7 हजार कोटी रुपये क्लेमच्या रुपात दिले गेले. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक विमा योजनेत संशोधन करण्यास मंजुरी देण्यात आली, यामुळे शेतकऱ्यांसाठी आता ही योजना स्वैच्छिक झाली आहे.

केंद्र आणि राज्य सरकार या योजनेत 50 – 50 टक्के योगदान देते, परंतु उत्तर ईशान्य भारतातील शेतकऱ्यांसाठी सरकारने पाऊल उचलले आहे. या योजनेत 90 टक्के योगदान केंद्र सरकार देईल तर 10 टक्के योगदान राज्य सरकार देईल. याशिवाय 3 टक्के योजनेची रक्कम प्रशासकीय व्यवस्थेवर असेल असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.

10 हजार शेतकऱ्यांचा उत्पादक संघ बनवण्याचे लक्ष –
ते म्हणाले की, कॅबिनेटने 10 हजार शेतकऱ्यांचा उत्पादक संघ तयार करण्याचे लक्ष ठेवले आहे.
सरकारने डेअरी क्षेत्राला प्रोस्ताहित करण्यासाठी 4,558 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. यामुळे जवळपास 95 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. प्रकाश जावडेकर यांनी या संबंधित माहिती दिली. ते म्हणाले की, यामुळे देशात दुग्ध क्रांतीचा नवा अध्याय सुरु होईल.