… म्हणून ‘ठाकरे सरकार’च्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकूण 6 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र अजूनही महाविकास आघाडीचं खातेवाटप करण्यात आलेलं नाही. काँग्रेस-शिवसेना दोन्ही पक्षाचे नेते मंत्रिमंडळ विस्तारासाठी तयार आहेत. मात्र राष्ट्रवादीत सुसूत्रता नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घटनेनंतर अखेर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या सत्तावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप येत्या दोन दिवसांत जाहीर होईल, अशी माहिती काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

मंत्री सुभाष देसाई यांच्या बंगल्यावर काँग्रेस-शिवसेना नेत्यांची बैठक झाली या बैठकीत दोन्ही पक्षाचे नेते मंत्रिमंडळ विस्तारासाठी तयार असल्याची माहिती आहे. मात्र राष्ट्रवादीत अनेक जण मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री पदावरून गोंधळ झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या अजित पवार यांना ही जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा सुरु आहे. तसेच जयंत पाटील हेही या शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहेत. अजित पवारांनी केलेलं बंड पाहता त्यांना मंत्रिपद देण्याचे सर्वाधिकार शरद पवारांना देण्यात आले आहेत. मात्र शरद पवार सध्या संसदेच्या अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबलेला आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like