खुशखबर ! मोदी सरकारकडून शेतकर्‍यांना दिवाळीपुर्वीच ‘गिफ्ट’, PM किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केली ‘ही’ घोषणा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवाळी आधी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत रक्कम मिळण्यासाठी आधार लिंक करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. शेतकरी आता 30 नोव्हेंबरपर्यंत आपला आधार नंबर लिंक करु शकतात.

30 नोव्हेंबरपर्यंत आधार लिंक करण्याची संधी –

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेटमधील निर्णयाची माहिती दिली, ते म्हणाले की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधार लिंक करण्याची मर्यादा वाढवली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकरी आपला आधार नंबर योजनेला जोडू शकतात. 1 ऑगस्ट 2019 नंतर टप्याटप्यांनी रक्कम मिळवण्यासाठी आधार लिंक असणे अनिवार्य आहे. योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 2 – 2 हजार रुपये शेतीसाठी देण्यात येतील.

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, या योजनेचा फायदा 7 कोटी शेतकऱ्यांना मिळाला. या योजनेत एकूण 14 कोटी शेतकऱ्यांना फायदा मिळेल. पश्चिम बंगाल आणि दिल्लीतील शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत नाही.

फायदा न मिळाल्यास या हेल्पलाइनवर करा संपर्क –

या योजनेत तुमची नोंदणी झाली आहे परंतू तुम्हाला पैसे मिळत नसतील तर चिंता करण्याचे कारण नाही. पहिल्यांदा तुम्ही तुमच्या जवळच्या महसूल अधिकारी म्हणजेच लेखापाल आणि कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. तेथे जाऊन फायदा झाला नाही तर सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम किसान हेल्प डेस्कच्या ई मेल [email protected] वर संपर्क साधता येईल, तेथे देखील फायदा झाला नाही तर तुम्ही 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

यांना मिळणार नाही फायदा –

– केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू केली आहे परंतू काही अटी मात्र घातल्या आहेत.
– एमपी, एमएलए, मंत्री आणि महापौर या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत, मग भले की ते शेतकरी असतील.
– केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी किंवा 10 हजार पेक्षा जास्त पेंशन मिळणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
– डॉक्टर, इंजिनिअर, सीए, वकील, आर्किटेक्ट यातील कोणीही शेती देखील करत असेल तरी देखील त्यांना लाभ मिळणार नाही.
– मागील वर्षी आयकर भरणारे याचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
– याशिवाय केंद्र, राज्य सरकारमधील मल्टी टास्किंग स्टाफ, चतुर्थ श्रेणी, समूह डीचे कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

Visit : Policenama.com