पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या ‘बंगल्यातील सर्व्हंट क्वार्टरला आग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या बंगल्यातील सर्व्हंट क्वार्टरला आग लागली. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारुन आग आटोक्यात आणली. ही घटना गिरीश बापट यांच्या मलबार हिल येथील बंगल्यात आज रात्री घडली.

मुंबईतील मलबार हिल येथे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा बंगला आहे. या बंगल्याचं नाव ज्ञानेश्वर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्याशेजारीच हा बंगला आहे. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बंगल्यातील क्वार्टरला ही आग लागली. याबाबत माहिती मिळताच, तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तर, यावेळी खुद्द जलसंधारणंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. त्यांनीही आग विझविण्यासाठी धावपळ केली.

त्यानंतर, तात्काळ आग आटोक्यात आणण्यात आली असून आगीचे कुणीही जखमी नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, काही प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे जवळच महादेव जानकर यांचाही बंगला आहे.

ज्यांना राजकारणात मोठे केले तेच माझी साथ सोडून गेले
बीड चे DM आणि PM एकाच मंचावर

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us