शिवसेनेच्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी, 2 महिला जखमी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्रिपद मिळालेल्या गुलाबराव पाटील यांचे आज (बुधवार) दुपारी जळगाव रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. गुलाबराव पाटील हे मुंबईहून गितांजली एक्स्प्रेसने जळगाव येथे आले. गुलाबराव पाटील प्लॅटफॉर्मवर येताच त्यांच्या स्वागतासाठी जमा झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत दोन ज्येष्ठ महिला जखमी झाल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, गुलाबराव पाटील यानी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या मायभूमीत आले आहेत. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गुलाबराव पाटील यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती. गुलाबराव पाटील रेल्वे स्थानकावर येताच त्यांचे स्वागत करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत पक्षातील दोन वृद्ध महिला जखमी झाल्या.

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकाच वेळी त्यांच्या दिशेने धाव घेतल्याने गुलाबराव पाटील देखील कार्यकर्त्यांच्या घोळक्यात काहीवेळ अडकून पडले. अखेर पोलीसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना बाजूला सारून प्लॅटफॉर्मवरील एका जिन्यावर गुलाबराव पाटील यांना नेले. कार्यकर्त्यांची गर्दी ओसरल्यानंतर पाटील यांना पोलिसांनी सुरक्षितपणे रेल्वे स्थानकाबाहेर नेले. त्यानंतर गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची मिरवणूक काढली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?