Pune Crime News | पैशाच्या वादातून दोघांचे अपहरण, कोल्हापूरच्या सीआरपीएफ जवानासह दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पैशाच्या वादातून दोन तरुणांचे फिल्मीस्टाईल अपहरण करून एका तरुणाला मारहाण केल्याची घटना सिंहगड रोड परिसरात घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या आरोपींचा पाठलाग सुरु केला. अखेर वाकड येथील भूमकर चौकात (wakad bhumkar chowk) त्यांना पकडण्यात यश आले. दोन्ही तरूणांची सुटका करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सीआरपीएफ जवानाचाही (CRPF Jawan) सहभाग असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे (senior police inspector Devidas Gheware) यांनी सांगितले. pune crime news | kolhapur crpf jawan arrested in Pune

प्रभात तुकाराम तोडकर आणि अजित राऊत (कोल्हापूर) यांची सुटका करण्यात आली आहे. अपहरण केल्याप्रकरणी अविनाश पांडुरंग पाटील (वय३१) व उत्तम तुरंबेकर (वय ३१, दोघेही रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) यांना अटक केली असून उत्तम तुरंबेकर हा झारखंड येथे सीआरपीएफमध्ये कार्यरत आहे. याबाबत निखिल उदय गुरव यांनी फिर्यादी दिली आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निखील व प्रभात हे दोघे एकमेकांचे रुम पार्टनर असून अविनाश पाटील हाही गावाजवळ राहणारा असल्याने ओळखीचा आहे. अविनाश आणि तुरंबेकर हे एकमेकांच्या ओखळीचे आहेत. प्रभातचा मित्र संदीप पाटील याला पैशाची गरज असल्याने अविनाश पाटील आणि उत्तम तुरंबेकर यांनी त्याला पैसे दिले होते. परंतु, काही दिवसांपासू संदीप हा अविनाभ आणि उत्तम याला मिळत नव्हता. त्यांचे पैसे त्याचेकडे अडकले असल्याने सोमवारी सायंकाळी प्रभात तोडकरला अविनाश आणि उत्तम हे दोघे मारहाण करत असल्याचे निखीलच्या निदर्शनास आले. त्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अजित राऊत ही तेथे उभा होता.

अविनाश आणि उत्तम हे दोघे वारंवार प्रभातला संदीप कोठे राहतो त्याच्याकडे घेऊन चल असे म्हणत होता निखीलने विचारणा केली असता आमच्यामध्ये पडू नको म्हणून अविनशने त्याला ढकलले. अजितने निखीलला सांगितले की, अविनाश आणि उत्तम यांनी कोल्हापूरहून मला बोलावून घेतले असून दोघांनी मारहाण करत पैशाची मागणी करत आहेत. प्रभातकडून पैसे मागत आहेत. यानंतर प्रभात आणि अजित या दोघांनाही नर्हेच्या दिशेने नेहण्यात आले. दरम्यानच्या काळात आरोपींनी प्रभातच्या डोक्यात बिअरची बाटली मारून जखमी केले. हा प्रकार प्रभातने निखिलला सांगितला. तसेच संदीपला पैसे द्यायला सांग नाही तर हे लोक जीवंत सोडणार नाहीत असे सांगितले. निखील घाबरला त्याने संदीपला फोन करून सर्व प्रकार सांगितल्यानंतर दोघांनीही थेट पोलीस ठाणे गाठले.

सर्व प्रकार सांगितल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदाव घेवारे (senior police inspector Devidas Gheware) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पी.बी.कणसे,
उपनिरीक्षक नितीन जाधव, कुलदिप संकपाळ, ए.बी.काळे
यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झालेल्या,
अविनाश आणि उत्तम यांना वाकड येथील भुमकर पुलाजवळ सापळा रचून पकडण्यात आले.
अपहरण केलेल्या दोघांची सुटकाही करण्यात आली.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : pune crime news | kolhapur crpf jawan arrested in Pune

 

हे देखील वाचा

Pune Police News | 27 वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार,
पोलिस कर्मचार्‍याला पोलिस कोठडी

Basmati Rice | ‘किंग ऑफ राईस’ – बासमती चे उत्पादन कमी – ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ 4 जणांचे आभार

UIDAI ने Aadhaar Card संबंधीत 2 विशेष सेवा अनिश्चित काळासाठी केल्या बंद; जाणून घ्या

Modi Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता भाजप संघटनेतही होणार बदल;
प्रकाश जावडेकर, ‘या’ दिग्गजांना मिळणार महत्त्वाची जबाबदारी