Cabinet Minister Narayan Rane। ‘अन्याय सहन न करणारा स्वभाव असल्यानेच नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले; पवारांनी काढलं होतं गौरवोद्गार

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी संपन्न झाला. त्या मंत्रिमंडळात तब्बल 43 खासदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रपती भवन येथे शपथविधी पार पडला आहे. या मंत्रिमंडळापैकी मंत्रीपदे महाराष्ट्राला दिले आहेत. 1 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदे महाराष्ट्राला दिली आहेत. भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणेंना (Cabinet Minister Narayan Rane) कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. आता त्यांच्याकडे लघु आणि मध्यम उद्योगे हे खातं आहे. Cabinet Minister Narayan Rane । rane quit shiv sena because his intolerant nature sharad pawar had appreciated

नारायण राणेंना दिलेल्या केंद्रीय मंत्रिपदाचा दर्जा हा कोकणामध्ये शिवसेनेला आव्हान असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
म्हणून, नारायण राणेंनी शिवसेना (Shiv Sena) का सोडली? यापासून ते त्यांच्या आणि शिवसेनेच्या मतभेदातील गोष्टींवर प्रकाश पडत आहे.
शिवसेनेच्या सत्ता काळामध्ये नारायण राणे यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे.
त्यांनतर शिवसेनेला रामराम करून त्यांनी काँग्रेसमध्ये उडी घेतली.
त्यावेळी तेथे ते महसूल मंत्री होते. नंतर काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपचं कमळ हातात घेतले.
आणि थेट केंद्रीय मंत्री वर्णी झाले.

‘मी 39 वर्षे शिवसेनेत होतो. बाळासाहेब ठाकरेंनी मला कॅबिनेटमंत्री आणि मग मुख्यमंत्री केलं.
मी काहीही मागितलं नव्हतं. परंतु त्यांनी मला दिलं, असे सांगत बाळासाहेबांबद्दलचा आदर आजही कायम असल्याचं नारायण राणेंनी म्हटलं आहे.
तसेच, राणे यांनी ‘झंझावात’ नावाचे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आले.
तर पुस्तकाची प्रस्तावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. म्हणून या पुस्तकाचं प्रकाशनही त्यांच्या हस्तेच करण्यात आले.
तर, ‘झंझावात’ प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना नारायण राणेंनी आपलं संपूर्ण भाषण बाळासाहेबांबद्दलच केलं.
माझ्यावर आई-वडिलांनी जेवढं प्रेम केलं, त्यापेक्षा जास्त प्रेम बाळासाहेबांनी केलं, असं म्हणताना ते भावूक झाले होते.
शिवसेनेचं प्रमुख नेतृत्व बदलल्यानं राणेंच्या आयुष्यात मोठा बदल झाला, ज्यामुळे त्यांच्या राजकीय प्रगतीला अनेकदा ब्रेक मिळाला होता.
मात्र, भाजपाने (BJP) पुन्हा एकदा नारायण राणेंना मोठी संधी दिली आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

या दरम्यान, ‘नारायण राणेंना पाच वर्षे मुख्यमंत्री पद मिळायला हवे होते.
अन्याय सहन न करणारा स्वभाव असल्यानेच ते शिवसेनेतून बाहेर पडले, असं गौरवोद्गार देखील शरद पवार (Sharad Pawar) यांनी काढले होते.
तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी म्हटलं होत की, ‘पालिका शाळेतील विद्यार्थ्यांने ‘मेरिट’ मिळवल्याप्रमाणेच नारायण राणेंचे आयुष्य आहे.
नारायण राणे यांचे जीवन पालिका शाळेतील विद्यार्थ्यांने ‘मेरिट’ मिळवल्याप्रमाणेच त्यांचं आयुष्य आहे, असं नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी म्हटलं होतं.
तसेच, नारायण राणेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आमच्यात थोडीफार धुसफूस झाली. ‘शिवसेना सोडू नका, असे मी राणेंना समजावले होते.
त्यावेळी राणेंच्या डोळ्यांतही अश्रू होते, तसेच मी हा निर्णय आनंदाने घेत नसल्याचे त्यांनी मला सांगितले, असं गडकरींनी म्हटलं होतं.

Web Title : Cabinet Minister Narayan Rane । rane quit shiv sena because his intolerant nature sharad pawar had appreciated

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bhosari MIDC Land Scam Case | एकनाथ खडसेंची पत्नी मंदाकिनी यांना देखील ईडीचं समन्स, गिरीश चौधरीनंतर सासु-सासरे ‘रडार’वर?

Pimpri Crime News | ‘बजाज’ मधून निम्म्या किंमतीत गाड्यांचे आमिष पडले साडेसात लाखांना; बजाज कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून दोघा भावांनी घातला व्यावसायिकाला गंडा

Koregaon Bhima Inquiry Commission | कोरेगाव भीमा हिंसाचार आयोग साक्षीसाठी शरद पवार यांना बोलवणार; कोरोनामुळे ठप्प झाले होते कामकाज