मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भावाला मंत्रीपद न मिळाल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नाराज असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. शपथ विधीनंतर कोणाला कोणते खाते मिळणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून होते. राऊत यांनी खातेवाटपाबाबत महत्वाचे विधान केले आहे. ते म्हणतात खातेवाटपावरून तीनही पक्षांमध्ये कोणताच वाद नसून आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप होऊ शकते.
मंत्रीपदावरून नाराज असलेल्या नेत्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः संवाद साधून मार्ग काढणार असल्याची माहिती देखील संजय राऊत यांनी दिली आहे. मात्र भावाला मंत्रीपद न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु होती तसेच मंत्रीपदावरून अनेक जुने शिवसेना नेते देखील नाराज असल्याचे दिसून आले होते.
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी खातेवाटप आणि नाराजीबद्दल खुलासा केला आहे. खातेवाटपावरून तीनही पक्षांमध्ये कुरबुरी नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. खातेवाटप आधीच झालेले असून आता असलेली नाराजी ही त्या त्या पक्षातील अंतर्गत विषय असल्याचे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांकडून खातेवाटपासाठी कोणताही विलंब झालेला नाही सध्या सुकाणू समितीच्या माध्यमातून समन्वय साधला जात आहे त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
खाते वाटपावरून शिवसेनेतील काही नेत्यामध्ये नाराजी आहे मात्र महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आणि १५ मंत्रीपदे आलेली आहेत. त्यात छोटे मित्रपक्ष आणि अपक्षांची शिवसेनेने मंत्री पदात वाटा दिलेला आहे. यावेळी अनेकांना मंत्रीपदाची इच्छा होती त्यामुळे अनेकजण नाराज देखील आहेत मात्र त्यांच्याशी संवाद साधून त्यांची नाराजी दूर करूण्याचा प्रयत्न देखील करू यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराजांशी संवाद साधतील असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच दिवाकर रावते आणि रामदास कदम हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत ते मंत्रिपदासाठी तडफड करणारे नाहीत. उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही यावर माझा विश्वास नाही असे म्हणत राऊत यांनी भास्कर जाधव यांना टोला लगावला आहे.
पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
- ‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
- जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
- मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
- गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
- मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
- लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?