home page top 1

मुख्यमंत्री-राज्यपाल भेटीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराची पुन्हा चर्चा, कुणाची ‘लॉटरी’ तर कुणाला ‘गाजर’

मुंबई : वृत्तसंस्था – मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपालांची भेट घेतल्याने मंत्रिमंडळाच्या विस्तारात समावेश होईल यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून पुन्हा जोरदार ‘फिल्डिंग’ लावली जात आहे मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी मंत्रीमंडळाचा शेवटचा विस्तार होईल असे बोलले जात आहे. त्यामुळे फडणवीस सरकारमध्ये कुणाला ‘लॉटरी ‘ लागते कि केवळ ‘गाजरे’च दाखवली जातात, हेही आता स्पष्ट होणार आहे.

पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून [ दि. १७ जूनपासून ] प्रारंभ होत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी राज्यपालांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केल्याने पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये थेट राज्यात विधानसभेचा बार उडणार आहे.यंदा लोकसभेत मिळालेले अभूतपूर्व यश पाहता ,मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोणा- कोणाची वर्णी लागते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

‘इकडे आड,तिकडे विहीर’ ;फडणवीस सरकारची अवस्था

मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जे – जे इच्छुक आहेत, त्यांना कसे सामावून घेतले जाईल यापेक्षा त्यांना संधी दिली नाहीतर त्याचा विधानसभेला विपरीत परिणाम होणार का ? या मुद्द्यांवरही चर्चा सुरु झाली आहे. भाजप- शिवसेनेतील अनेक आमदार आपल्याला मंत्रिपद मिळेल या आशेवर बसले आहेत. मात्र, भाजपकडून राधाकृष्ण विखे, तर माढ्यात कमळ फुलवण्याचा शब्द देणारे मोहितेंना तर शिवसेनेतून जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

मात्र, या ‘आयात ‘ नेत्यांना लागलीच मंत्रिपद दिली तर युतीत असंतोषाचा भडका उडेल व त्याचा फटका आगामी निवडणुकीत बसेल अशी भीती भाजप-सेना नेतृत्त्वाला आहे. त्यामुळे विस्ताराचे घोंगडे भिजत पडल्याचे बोलले जात आहे. मात्र, आज शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपाल राव यांची राजभवन येथे जाऊन भेट घेतल्याने पुन्हा एकदा विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान शनिवारी दि १५ जून रोजी मुख्यमंत्री निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत,त्यानंतर ते भाजप अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला ‘ग्रीन सिग्नल ‘ मिळाल्याचे बोलले जात आहे ;पण तारेवरची कसरत फडणवीस सरकारची होणार आहे.

सिने जगत – 

…म्हणून हॉलीवूड सिंगर सेलेना गोमेज सोशल मिडियापासून राहते ‘दूर’

ब्रेकअपनंतर अशी झाली होती शाहिद कपूरची ‘हालत’

#Video : म्हणून बोनी कपूरने सार्वजनिक ठिकाणी घातला होता श्रीदेवीच्या पँटमध्ये हात

वाढदिवशीच दिशा पाटनीच्या घरी आला ‘नवा पाहुणा’

Loading...
You might also like