Cabinet restructuring । ‘मंत्रिमंडळ पुनर्रचनेसाठी काँग्रेसचा वाढता दबाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama Online) – राज्य विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्ष (Speaker of the Assembly) हा काँग्रेसचा (Congress) होणार असल्याचं काँग्रेस पक्षाने स्पष्ट केलं आहे. तर आता काँग्रेसपक्ष (Congress) राज्य मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेसाठी (Cabinet restructuring) आणखी दबाब निर्माण करीत आहे. दरम्यान अधिवेशनानंतर महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) मंत्रीमंडळ पुनर्रचना (Cabinet restructuring) झाली पाहिजे, असं त्याला हवे आहे. याच भूमिकेचे संकेत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिले आहे. (Increasing pressure from Congress for cabinet reshuffle)

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

तर, आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi government) काँग्रेस (Congress) हा महत्वाचा भागीदार आहे. ‘हे काम शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तिन्ही पक्षातील नेत्यांशी विचार विनिमय करून केले जाईल. या पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून विषयावर चर्चा करतील, असं एका काँग्रेस (Congress) नेत्याने म्हटलं आहे. तसेच, 2019 मध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री झाले. नंतर या तीन पक्षांच्या नेत्यांना मंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारावर आणि सरकारमध्ये आणखी उर्जा आणि प्रतिभा यावी वाटते म्हणून मंत्रिमंडळ पुनर्रचना गरजेची वाटते. सरकार अस्थिर आहे हा विरोधकांकडून होणारा प्रचारही या पुनर्रचनेमुळे निकाली काढता येईल, अशी देखील भूमिका आहे. याशिवाय, पुनर्रचनेमुळे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi government) शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विश्वास दिला जाऊ शकेल कारण ठाकरे सरकार त्याची मुदत पूर्ण करील, असं त्या नेत्यानं म्हटलं आहे.

या दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून (BJP) मागील काही दिवस सरकारबाबत अपप्रचार सुरूय. सत्ताधारी आघाडीतील मतभेद आणि आपापसांतील दबावामुळे हे सरकार फार दिवस टिकणार नाही असा समज झालेल्या नोकरशाहीतील एका गटाला देखील या माध्यमातून स्पष्ट संदेश जाईल. शिवसेना आमदारांतील एक गट अजून डॆहील पक्षाने भाजपसोबतच असले पाहिजे, असा वाटणारा देखील आहे. दरम्यान, काँग्रेसने (Congress) महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी (Speaker of the Assembly) कोणाचेही नाव निश्चित केलेले नाही, असं स्पष्ट केलंय. तर अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली की मग नाव महाराष्ट्र काँग्रेसला आणि त्याच्या विधिमंडळ पक्षाला कळवले जाणार आहे.

Web Titel :- Cabinet restructuring । increasing pressure congress reshuffle cabinet

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharera | महारेराचा मोठा निर्णय ! ‘त्या’ बिल्डरांना बसणार चाप

Covishield | ऑक्सफर्डचे नवे संशोधन ! ‘कोविशील्ड’चा तिसरा डोस घेतल्यास कोरोनापासून अधिक सुरक्षा

Pune News | पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाकडून रहिवाशाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल