पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! 44900 रूपये पगार, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कॅबिनेट सचिवालयात फिल्ड कार्यालयामध्ये 29 पदांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती 29 डेप्युटी फिल्ड ऑफिसर्सच्या पदांसाठी असेल. उमेदवारांसाठी अर्जाची तारीख 12 नोव्हेंबर 2019 असणार आहे.

पदांची माहिती –
फिल्ड ऑफिसर – 29 पद

वेतनमान –
44,900 रुपये, स्तर – 7

शैक्षणिक पात्रता –
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक

वयोमर्यादा –
उमेदवारासाठी अधिकतम वय 30 वर्षांपर्यंत

अर्जासाठीचे शुल्क –
जनरल, ओबीसी, महिला, एससी, एसटी, पीडब्यूडीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.

महत्वाच्या तारखा –
अर्ज भरण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2019 असेल.

असा करा अर्ज –
इच्छूक उमेदवारांनी अर्जाच्या पात्रतेनुसार योग्यता, अनुभव इत्यादी माहिती फोटो कॉपीसह पोस्ट बॅग नंबर 001, लोधी रोड हेड पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली -110003 या पत्यावर 12.11.2019 पर्यंत पाठवावेत.

नोकरीचे ठिकाण –
नवी दिल्ली

निवड प्रक्रिया –
निवड लेखी परिक्षा, संगणक चाचणी परिक्षा (सीपीटी) आणि मुलाखत या आधारे करण्यात येईल.
अर्जदार http://davp.nic.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आधिक माहिती मिळवू शकतात आणि अर्ज करु शकतात.

Visit : Policenama.com