मोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये राहणार्‍या 40 लाख लोकांना ‘मालकी’ हक्क देणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने दिल्लीतील जनतेला दिवाळी आधीच मोठी भेट दिली आहे. दिल्लीत अनधिकृतपणे कॉलनीमध्ये राहणाऱ्या 40 लाख लोकांना सरकार आता मालकी हक्क देणार आहे.

दिल्लीतील 1797 कॉलनी होणार अधिकृत
केंद्रीय कॅबिनेटने दिल्लीतील अनधिकृत कॉलनींना अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत एकूण 1797 अनधिकृत कॉलनी आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे चाळीस लाख लोकांना याचा फायदा होणार आहे.

तीन कॉलनी होणार नाहीत अधिकृत
सैनिक फार्म, महेंद्रू इन्क्लेव आणि अनंतराम डेयरी या तीन कॉलनी अधिकृत केल्या जाणार नाहीत. असे सांगण्यात येत आहे की या कॉलनी सरकारी जमीन, शेतीची जमीन आणि ग्रामसभेच्या जमिनीवर वसलेल्या आहेत.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. 1947 मध्ये देश फाळणी नंतर 8 लाख आणि आज दिल्लीची दोन कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. न्यायालयात दिल्ली सरकारने 2021 पर्यंतचा वेळ मागितला होता. मात्र केंद्र सरकारने यात लक्ष घालून ठोस पावले उचलण्याचा निर्धार केला आहे.

बँकेकडून कर्ज मिळणार सोपे होणार
अनधिकृत कॉलनीमध्ये राहत असलेल्यांना अधिकृतरीत्या मालकी हक्क मिळाल्याने बँकेचे कर्ज मिळणे देखील सोपे होणार आहे. सध्या येथील लोकांना कर्ज घेताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

Visit : Policenama.com