आश्‍चर्यकारक ! एका बाटलीनं वाचवलं 40 फूट दरीत अडकलेल्या कुटूंबाला

कॅलिफोनिया : वृत्तसंस्था – फिरायला गेलेले एक कुटुंब ४० फुट खोल दरीत अडकले होते. त्यांचे प्राण एका पाण्याच्या बाटलीने वाचविले. आश्चर्य वाटते ना पण ते खरे आहे. त्याचे असे झाले की, कर्टिस विटसन, त्यांची पत्नी आणि १३ वर्षाचा मुलगा कॅलिफोनियात फिरायला गेले होते. एका घाटीमध्ये ते उतरले. अरोया सेको नदी व परिसरात फिरत असताना एका झऱ्याजवळ ते जात होते. मात्र, तेथे जाताना ते एका मोठ्या दरीत अडकले. त्यांच्या दोन्ही बाजूला ४० फुट उंच पहाड होते. आता काय करायचे असा त्यांना प्रश्न पडला.

nfa-miller-message-in-a-bottel-needs-broll-and-tracks-frame-1095.jpg

संपर्काची काहीही साधने नव्हती. तेव्हा कर्टिस यांना एक कल्पना सुचली. त्यांनी आपल्याकडील पाण्याच्या बाटलीवर हेल्प असे लिहिले. त्याच्या आत एक कागदावर संदेश लिहून आपले ठिकाण सांगितले. त्यानंतर त्यांनी ती बाटली झऱ्याच्या पाण्यात टाकली. ही बाटली वाहत वाहत सुमारे ४०० मीटर दूर गेली. तेथे एक हाइकर्सचा ग्रुप हायकिंग करीत होता. त्यांच्या हाताला ही बाटली लागली. ते तातडीने या कुटुंबियांपर्यंत पोहचले. त्यांनी त्यांना मदत करुन सुरक्षितस्थळी पोहचविले. एका बाटलीमुळे या कुटुंबियांना मदत मिळू शकली.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या