अनधिकृत बांधकामाच्या नियमितीसाठी विशेष सभा बोलवा : शिवसेना 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन 

शहरातील अनधिकृत बांधकामे नियमीत करण्यासाठी किती दंड आकारायचा याचे सर्व अधिकार संबंधित महापालिकांना देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी चिंचवड येथेनुकतीच केली. त्यामुळे महापालिकेने तातडीने विशेष सभा बोलवून यावर चर्चा करावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B01MYWOV9B’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eddac03f-9080-11e8-b70a-6be8d4f8132a’]

शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, महिला आघाडी शहर संघटक सुलभा उबाळे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोहाळे, विधानसभा संघटक रोमी संधू, जितेंद्र ननावरे, नगरसेवक प्रमोद कुटे आदींनी महापालिकेतील सभागृह नेते एकनाथ पवार यांना निवेदन दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी चिंचवडगाव येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी शुल्क ठरविण्याचेअधिकार संबंधित महापालिकांना देणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनुसार शहरात अनधिकृत घरांमध्ये राहणाऱ्या  नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यानुसार,अनधिकृत  बांधकामे नियमित करण्यासाठी शुल्क ठरविण्याकरिता तातडीने महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.