Call Blocking Android Apps | सातत्याने येणारे ‘स्पॅम कॉल्स’ अडथळा निर्माण करतात? मग ‘या’ 5 अ‍ॅप्समधून नंबर्स करा ब्लॉक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Call Blocking Android Apps | आपण एखाद्या कामात असेल अथवा एखाद्या कार्यक्रमात असेल त्याचवेळी स्पॅम काॅल (Spam Calls) येत असतो. तेव्हा या स्पॅम काॅलने एक अडथळा निर्माण होतो. अशा सातत्याने येणा-या स्पॅम काॅलवर अटकाव घालण्यासाठी एका अ‍ॅप्सची तुम्हाला मदत मिळू शकते. कॉल ब्लॉकिंग (Call blocking) अ‍ॅप्स असं त्याचं नाव आहे. Google Play Store या अ‍ॅप्सवरुन तुम्ही कॉल ब्लॉकिंग अ‍ॅप्स घेऊ शकता. यामुळे येणारे स्पॅम काॅल तुम्ही बंद करु शकता. दरम्यान, नंबरदेखील ब्लाॅक करु शकता. याचबरोबर असे स्पॅम काॅल कंट्रोल करण्यासाठी अनेक अशा अ‍ॅप्सची (Call Blocking Android Apps) माहिती जाणून घ्या.

1. Truecaller –

अँड्रॉइड (Android) यूजर्ससाठी ट्रूकॉलर (Truecaller) सर्वात चांगल्या कॉल ब्लॉकिंग (Call blocking) अ‍ॅपपैकी एक आहे. हे अ‍ॅप चांगल्या यूआय सोबत येते व यूजर्सला सर्व सुविधा पुरवते. या अ‍ॅपच्या माध्यमातून अनोळखी कॉल्स ओळखता येतात. सोबतच, स्पॅम कॉल आणि एसएमएस पासून देखील सुरक्षित ठेवते. हे फसवणूक, टेलिकार्केटिंग आणि अन्य इनकमिंग कॉल्स/मेसेज ची ओळख पटवते. अशा नंबर्सला तुम्ही ब्लॉकही करु शकता. याप्रकारे तुम्ही ज्या नंबर्सला ब्लाॅक करायचे आहे. त्याची यादी संकलित करू शकता.

2. Hiya –

हिया (Hiya) देखील लोकप्रिय अ‍ॅपपैकी एक आहे. यात जाहिराती नसतात. ही चांगली गोष्ट आहे. याचे यूआय चांगले आहे. अनेक फीचर्स मिळतात. हे कॉल ब्लॉकिंग अ‍ॅपप्रमाणे इनकमिंग कॉलची ओळख पटवते. तसेच, स्मार्ट डायलरमध्ये नंबर ठेवू शकता. स्पॅम नंबरला मॅन्यूल ब्लॉक आणि रिपोर्ट करता येईल. तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट्समधील नाव आणि पत्ता याच्याशी जोडू शकता. हे अ‍ॅप रोबोकॉल, मार्केटर्स, डेट कलेक्टर्स आणि फ्रॉड कॉल्स ओळखते.

3. Calls Blacklist –

कॉल्स ब्लॅकलिस्ट (Calls Blacklist) एक चांगले कॉल ब्लॉकिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये नंबर ब्लॉक करणे सोपे आहे. तसेच, हे कॉलसह एसएमएस देखील ब्लॉक करू शकते. तसेच, टेलिमार्केटिंग, स्पॅम आणि रोबोकॉलला ब्लॉक करण्यास सक्षम आहे, असे कॉल्स तुम्ही स्वतः देखील ब्लॉक करू शकणार आहे.

 

4. Call Blocker by Fiorenza Francesco –

कॉल ब्लॉकिंगसाठी तुम्ही Call Blocker by Fiorenza Francesco अ‍ॅपचाही वापर करू शकता. या अ‍ॅपचे यूआय अनेक फीचर्स उपलब्ध आहे. हे अ‍ॅप्लिकेशन Call Center, Spam Number, Robocall, Telemarketing सह अनोळखी कॉल्सला ब्लॉक करते. तुम्ही अ‍ॅपवरून कोणत्याही नंबर ब्लॉक करू शकता. तसेच, ठराविक कालावधीसाठी कॉल ब्लॉकिंगची सुविधा देखील मिळणार आहे.

5. Should I Answer? –

Should I Answer? हे एक चांगले अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला कॉल ब्लॉकिंगबाबत सर्व सुविधा मिळतील.
अ‍ॅपमध्ये स्पॅम नंबर्सचा एका मोठा डेटाबेस असून, हा डेटाबेस अपडेट होत जातो.
स्पॅम नंबर्सपैकी कोणी कॉल करत असेल तर हे आपोआप त्या नंबरला ब्लॉक करते.
अ‍ॅप हिडन, फॉरेन आणि प्रीमियम रेट नंबर्सला ब्लॉक करते.
तुम्हीही यात इतर नंबर्स समाविष्ट करू शकता. मुख्यत म्हणजे, अ‍ॅप वापरण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही.
फोन इंटरनेटशी कनेक्ट असताना अ‍ॅप स्थानिक डेटाबेस अपडेट करु शकते.

 

Web Title : Call Blocking Android Apps | top best call blocking android apps 2021 to block unwanted calls

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ration Card | नवीन शिधापत्रिकेसाठी आता उत्पन्न दाखल्याऐवजी हमीपत्रही ‘ग्राह्य’

NCRB | ऑनलाइन फसवणुकीत देशात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर

Earn Money | 1 लाख रूपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, 60 लाखापर्यंत होईल नफा; जाणून घ्या कशी करावी सुरूवात?