भाड्याच्या घरामध्ये ‘सेक्स’ रॅकेट, WhatsApp वर ‘रापचिक’ फोटो पाठवून केला जात होता ‘सौदा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – धर्मांची भूमी म्हणून ऋषिकेश हे शहर अत्यंत प्रसिद्ध आहे. याच शहरात देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तीन तरुण आणि तरुणींचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी या 6 जणांना अटक करुन त्यांच्याकडून 78 हजार रुपये जप्त केले.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस चीनी गोदाम रोड गल्ली नंबर 6 मध्ये पोहचले, तेव्हा पोलिसांना काही सेंट्रो कार येताना दिसल्या. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा विचार केला तेव्हा चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपी नारायण पालने पोलिसांना सांगितले की तो वाहनात बसलेल्या महिलांना देह व्यापारासाठी घेऊन जात होता. पोलिसांनी सांगितले की तो हा व्यवसाय त्याच्या भाड्याने राहत असलेल्या घरात करत होता. तेथे त्याने सेक्स रेकेटचा धंदा सुरु केला होता. तो तरुणींच्या मागणीनुसार त्यांना बाहेर पाठवण्यासाठी 20 हजार रुपये घेत होता.

नारायणने सांगितले की तो हा धंदा मागील 5 – 6 महिन्यापूर्वीपासून चालवत होता. तो व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना तरुणींचे फोटो पाठवून सौदा करत होता. तो गोविंदा नावाच्या एका व्यक्तीच्या मदतीने हा धंदा चालवत होता. पोलिसांनी तपासात सापडलेली कार ताब्यात घेतली आहे आणि गुन्हा दाखल केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/