call girl | कैद्यानं जेलमध्ये बोलावली कॉलगर्ल, व्हायरल फोटोमुळे खळबळ

नवी दिल्ली : ब्रिटनच्या सफोकमधील एचएम जेलच्या होलेस्ले बे येथे एक धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील मादक पदार्थांच्या गुन्ह्यासाठी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने जेलमध्ये कॉल गर्ल (call girl) बोलावल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या कैद्याने कॉलगर्लचे अश्चिल फोटो मोबाईलमध्ये काढले आणि ते व्हायरल झाले त्यामुळे हा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे जेलच्या सुरक्षेच्या मुद्दा ऐरणीवर आला आहे. दुसरे म्हणजे जेल मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यास कैद्यांना मनाई असतानाही कैद्याकडे फोन कोठून आला याचा तुरुंग प्रशासन शोध घेत आहे. ‘द सन’ या वेबसाइटने याबाबत वृत्त दिले आहे.

call girl | prisoner calls call girl in prison obscene pictures viral as well as video

दरम्यान, या प्रकराबाबत बोलताना कामगार खासदार आणि कॉमन्स जस्टिस सिलेक्ट कमिटीचे सदस्य अ‍ॅन्डी स्लॉटर म्हणाले की, ‘खुले कारागृह पुनर्वसनाची ठिकाणे आहेत, लोकांनी मजेत जीवन जगण्याची नाही’.

तुरुंगात आलेल्या संशयित महिलेचा शोध घेण्यात येत आहे. स्वतःचा जीव संकटात टाकून जेलमध्ये महिला येणे चुकीचे आहे. पुरुषाच्या तुरुंगात ती एकटीच आली होती. या ठिकाणी अनेक सराईत गुन्हेगार आहेत. हिंसक आणि बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणारे गुन्हेगारही याच ठिकाणी असून हि घटना जेलमधील सुरक्षेबाबत मोठा प्रश्न उपस्थित करणारी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या महिलेबद्दल तुरुंगातील इतर कैद्यांना जर माहिती मिळाली असती तर तिच्यावर हल्ला झाला असता अथवा तिचा जीवही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणामध्ये नवनवीन माहिती समोर येत असून हि महिला कायद्याची गर्लफ्रेंड असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, हे वर्तन चुकीचे आहे. त्यासाठी दोषीला शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणाचा तपास सुरु असून कारागृहात सुरक्षेबाबत अतिरिक्त उपाययोजना केल्याचे तुरुंग प्रशासनाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.

हे देखील वाचा

BJP MLA | भाजप आमदाराकडून अधिकारी पत्नीचा छळ; व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ

Zydus Cadila Vaccine | 12-18 वर्षाच्या मुलांसाठी लवकरच येत आहे zydus-cadila ची लस, सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितले

Family Pension | मोदी सरकारने दिला मोठा दिलासा ! पेन्शनरच्या मृत्यूनंतर आता कुटुंबाला पेन्शन मिळवण्यास येणार नाही अडचण, बँकांना दिले ‘हे’ निर्देश

Pollution and Corona | प्रदूषणाचं कोरोना कनेक्शन? देशात जिथं Pollution जास्त तिथं कोविड-19 जास्त घातक होता, स्टडीमध्ये मुंबई अन् पुण्याचा समावेश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : call girl | prisoner calls call girl in prison obscene pictures viral as well as video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update