आमदार होऊनही स्वतः करावा लागतोय सर्व खर्च, सर्व MLA अद्याप ‘बिनपगारी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निकालानंतर राज्यात अनेक वेगवान घडामोडी झाल्याचे पहायला मिळाले. घडामोडी इतक्या वेगवान होत्या की कधी नव्हे ते राज्याने फक्त ८० तासांचे मुख्यमंत्री देखील पाहिले. नुकतेच स्थापन झालेल्या ठाकरे सरकारने आपल्या मंत्री मंडळ विस्ताराला सुरुवात केल्याचे देखील पहायला मिळाले. राज्यात इतक्या घडामोडी सतत सुरु असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर बसला. एवढेच काय पण निवडून आलेल्या आमदारांना देखील अद्याप पगार मिळू शकलेला नाही अशी माहिती समोर येतीय.

आरटीआय कार्यकर्ते डॉ एस एस जाधव यांनी माहितीच्या अधिकारात ऑक्टोबर महिन्यात आमदारांना किती पगार आणि भत्ता दिला गेला याची माहिती मागवली होती. त्यावेळी सर्वच्या सर्व आमदार सध्या बिन पगारी फुल अधिकारी असल्याचे उघड झाले आहे. तसेच विधान मंडळ कार्यालयाने देखील याबाबत सांगताना अद्याप कोणत्याही आमदाराला पगार किंवा भत्ता दिला नसल्याची माहिती दिली आहे.

विधानसभेच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे आमदारांना शपत घेण्यास उशीर झाला अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदारांचा शपथविधी पार पडला मात्र सर्व आमदार सध्या पगारापासून आणि भत्त्यापासून वंचित आहेत आणि स्वखर्चाने आपले काम चालवत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like