आरतीला बोलावले अन ‘ते’ प्रसादाच्या स्टॉलवर कारवाई करुन गेले

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन

डॅशिंग आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची प्रचिती सध्या नाशिककर घेत आहेत. नाशिक मनपा आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या तुकाराम मुंढे यांनी बुधवारी सकाळी अशीच धडक कारवाई केली. नवरात्रीनिमित्त कालिका मंदिरात तुकाराम मुंढे आरतीकरीता पाहुणे म्हणून आले होते.  त्यावेळी मंदिरात आणि प्रसाद स्टॉल्सवर त्यांना प्लास्टिक दिसले. राज्यात प्लास्टिकबंदी असूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पाहून, आयुक्त तुकाराम मुंढे चांगलेच भडकले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cbf8945f-cc47-11e8-ad02-cd64d56198a4′]

नाशिकची ग्रामदेवता कालिका मंदिरात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आरतीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. सकाळी साडेआठ वाजता ते मंदिरात दाखल झाले. मात्र मंदिर परिसरात पाऊल ठेवताच त्यांना प्लास्टिक पिशव्या निदर्शनास पडल्या. पण त्यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. प्रमुख पाहुणे म्हणून बोलविल्याने त्यांनी मंदिराच्या धार्मिक प्रथेप्रमाणे पूजा केली. कालिका संस्थानच्या अध्यक्षांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केल्यानंतर, मुंढेंनी देवीची मनोभावे आरती केली.

दौंडमध्ये वाळू उपसा करणाऱ्या ११ बोटी जिलेटीनच्या स्फोटाने केल्या नष्ट

आरती होताच मंदिर संस्थानचे सर्व पदाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन,  त्यांनी अचानक परिसरातील प्रसाद स्टॉल्सची पाहणी केली. त्यावेळी त्यांना सर्वच स्टॉल्सवर प्लास्टिकचा सर्रासपणे वापर होत असल्याचे निदर्शनास आले. हे पाहून तुकाराम मुंढेंनी संध्याकाळपर्यंत प्लास्टिक वापर बंद न केल्यास, दुकाने हटवू असा इशारा यावेळी मुंढे यांनी दिला. इतकेच नाही तर मंदिराबाहेरील रस्त्यावर दुकानांनी अतिक्रमण केल्यास कारवाईचाही इशारा दिला.

[amazon_link asins=’B01M9EYA2I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’de9f8317-cc47-11e8-bd29-036484140d90′]