Yoga for Anxiety : तणाव आणि थकवा दूर पळवतील ‘ही’ 5 योगासन

नवी दिल्ली : शरीर फिट ठेवण्यासाठी लोक विविध प्रकारच्या एक्सरसाइज आणि योग करतात, परंतु जोपर्यंत तुम्ही मानसिकदृष्ट्या निरोगी राहणार नाही, तापर्यंत या एक्सरसाइजचा काहीही फायदा नाही. योग आणि वेलनेस कोच सुनैना रेखी यांनी अशीच 5 योगासन सांगितली आहेत, जी तणाव दूर करण्यात मदत करतात. जाणून घेवूयात याबाबत…

अनुलोम विलोम
हे प्राणायाम करण्यासाठी पाठ एकदम सरळ ठेवून बसा. आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी दाबून डाव्या नासिकेतून श्वास आतमध्ये घ्या आणि नंतर उजव्या नासिकेतून श्वास सोडा. हे तुम्ही ते ते 5 मिनिट करू शकता.

बालासन
बालासन करण्यासाठी गुडघे दुमडून बसा आणि हात शक्य तेवढे पुढील बाजूस खेचा. हे आसन खुप सोपे आहे आणि लाभादायक आहे. हे 5 मिनिट करा.

मार्जरीआसन
यामध्ये गुडघ्यांवर बसून पाठ मागच्या बाजूला झुकवा. श्वास आत घेत पोट आतल्या बाजूला आणि पुन्हा श्वास बाहेरच्या बाजूने हळुहळु सोडा. यामुळे डोकं शांत राहते.

पश्चिमोत्तानासन
यामध्ये पायांना आणि पाठीला एकदम सरळ ठेवा. आता हातांना पायांना पुढे सरकवत खेचा. डोक खाली झुकवा, नंतर हळुहळु हाता सामान्य आवस्थेत आणा.

शवासन
या आसनात आरामात खालच्या बाजूला झोपा आणि शरीर एकदम सैल सोडून द्या. या आसनात सर्व तणाव दूर होतात. हे आसन चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी वेलनेस कोच सुनैना रेखी यांचा व्हिडिओ पहा.