कंबोडिया : अंत्यसंस्कारावेळी तांदळापासून बनवलेली दारू पिल्यामुळं 7 जणांचा मृत्यू, तर 100 पेक्षा जास्त जण रुग्णालयात

कंबोडिया – वृत्तसंस्था –   अंत्यसंस्कारावेळी तांदळापासून बनविलेले मद्यपान घेतल्याने त्यातून अनेक लोकांना विषबाधा झाली आहे. कुजलेल्या तांदळापासून बनविलेले मद्यपान केल्यामुळे सात जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 130 हून अधिक लोक हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत.

अहवालानुसार, कंबोडियामधील कंपोंग छनांग प्रांतातील एका गावात अंत्यविधी कार्यक्रमाच्या वेळी दारूची व्यवस्था करण्यात आली होती. जिथे शेकडो लोकांनी त्याचे सेवन केले. दारू प्यायल्यानंतर ग्रामस्थांची प्रकृती खालावू लागली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे सात लोकांचा मृत्यू झाला.

तेथील आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तांदळापासून बनवलेल्या वाईनमध्ये काही विषारी पदार्थ सापडण्याची शक्यता आहे, ज्याची चौकशी चालू आहे. अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले की, काही लोक बरे झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयातूनही डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दुसरीकडे, आरोग्य मंत्रालयाकडून असे म्हटले आहे की, विषारी दारूची विक्री व सेवन रोखण्यासाठी अधिकाऱ्यांचे एक पथक गावात पाठविण्यात आले आहे. हे कंबोडियातील पहिले प्रकरण नाही. यापूर्वी सन 2018 मध्ये क्रेटी राज्यात 14 ग्रामस्थांचा दारूमुळे मृत्यू झाला होता, तर आणखी 200 आजारी पडले होते.

गेल्या जूनमध्येही कंबोडियाच्या बेन्टी मिन्चे राज्यात तांदळापासून बनविलेले मद्यपान केल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला होता, तर गंभीर आजारी असलेल्या 30 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

You might also like