आईच्या विचारांचा प्रभाव ‘गर्भा’वर होतो, ‘केंब्रिज’ विद्यापीठानं देखील केलं ‘मान्य’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जन्मजात मुलावर आईच्या आचार-विचारांचा प्रभाव पडण्याची मान्यता भारतीय तत्वज्ञानामध्ये जुनी आहे. शास्त्रात गर्भसंस्कारांचा उल्लेख आहे. त्याचे महत्त्व आता परदेशातही मान्य केले जात आहे. काही काळापूर्वी केंब्रिज विद्यापीठाने गर्भसंस्कारावर संशोधन केले होते. या संशोधनात असे निष्पन्न झाले आहे की आईचे वागणे, भावना आणि सामाजिक वातावरणाचा परिणाम गर्भावर होतो. हरिद्वारमधील शांतिकुंज येथून संचालित गर्भसंस्कार देश-विदेशात स्वीकारला जात आहे. हा संस्कार कोरोना संकटात ऑनलाइन करण्यात येत आहे.

केंब्रिज विद्यापीठातील डॉ. रूपर्ट शेलड्रेक यांच्या सिद्धांतानुसार, गर्भधारणेच्या वेळी आईचे विचार, भावना, आहार, कौटुंबिक आणि सामाजिक वातावरण गर्भाचे व्यक्तिमत्त्व, चारित्र्य, भावना, विचार आणि कौशल्यासाठी जबाबदार असतात. तसेच या गर्भसंस्कारांशी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, एनसीआर, उत्तराखंड, ओडिशा, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड आणि दक्षिण भारत ही राज्ये जुडलेली आहेत. तसेच रशिया, ऑस्ट्रेलिया, नेपाळ येथे देखील प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. तीन हजार 256 कार्यकर्त्यांना देश-विदेशात प्रशिक्षण देण्यात आले आहे. एका कार्यकर्त्यासोबत सुमारे 40 गर्भवती महिला गर्भसंस्कार समारंभात सामील होतात. आतापर्यंत लाखो गर्भसंस्कार करण्यात आले आहेत.

अशाप्रकारे होतो गर्भसंस्कार

गर्भाच्या मेंदूचा विकास तीन ते सात महिन्यांच्या कालावधीत वेगाने होतो. दर मिनिटाला अडीच ते पाच लाख पेशी मेंदूत निर्माण होतात. त्यांना न्यूरॉन्स म्हणतात. हे न्यूरॉन्स आईच्या क्रियाशीलतेद्वारे सक्रिय होतात. वैज्ञानिक संशोधनानुसार गर्भधारणेदरम्यान जर आई बौद्धिक क्रिया करत असेल, संगीत ऐकत असेल, महान पुरुषांची चरित्र वाचत असेल तर त्याचा न्युरॉनवर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे चांगल्या संप्रेरकांचा अधिक स्त्राव होतो. गर्भ संवाद देखील करतो. तो पटकन बीज मंत्र, बासरी, वाद्यांचा आवाज स्वीकारतो. यामुळे मेंदू अधिक सक्रिय होतो. संस्कृतच्या श्लोकांमुळे उजवा आणि डावा मेंदू संतुलित होतो. या सर्व क्रिया गर्भसंस्काराच्या दरम्यान शिकविल्या जातात. ही प्रक्रिया गर्भधारणेच्या तीन महिन्यांपासून सुरू होते आणि प्रसव होईपर्यंत सुरू राहते.

अमेरिकेतही मागणी

डॉ. रेखा प्रकाश समन्वयक, आओ गढे संस्कारवान पिढी, गुरुग्राम म्हणतात की गर्भसंस्कारामध्ये हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील गर्भवती महिला सामील झाल्या आहेत. कोरोना कालावधीत ऑनलाइन गर्भसंस्कार आयोजित करण्यात येत आहेत. अमेरिका, फ्लोरिडा येथून देखील गर्भवती महिला ऑनलाईन शिकत आहेत.

केंब्रिजमध्ये झाले संशोधन

डॉ.अमिता सक्सेना नोडल अधिकारी मध्य प्रदेश यांनी सांगितले की, केंब्रिजमध्ये आईच्या वर्तनाचा गर्भावर काय परिणाम होतो यावर संशोधन केले गेले आहे. आपली परंपरा परदेशातही मानली जात आहे. गर्भसंस्काराचा मुख्य उद्देश म्हणजे बाळाच्या मेंदूचे न्यूरॉन्स सक्रिय करणे. आम्ही याची चाचणी सीटी स्कॅनद्वारे देखील करतो.

डॉ. रेखा जेम्स, स्पीकर, आओ गढे संस्कारवान पिढी आणि ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ जबलपूर यांनी सांगितले की ख्रिश्चन समुदायही गर्भसंस्काराशी जोडलेला आहे. मी बायबलमधील कथा गर्भवती महिलांना सांगते. यामुळे गर्भाच्या मेंदूत सकारात्मक संदेश पोहोचतो. त्याचे चांगले परिणाम सिद्ध झाले आहेत.