Video : लग्नासाठी निघालेल्या वाहनाचा भीषण अपघात, एक ठार, 12 जण जखमी

मुझफ्फरनगर: पोलीसनामा ऑनलाईन – लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडी मंडळीच्या वाहनाला भरधाव वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगरमध्ये मंगळवारी (दि. 16) रात्री हा भीषण अपघात झाला. त्यामुळे आनंदात असलेल्या कुटुंब आणि नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. जखमीपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

वऱ्हाडी मंडळी आनंदात विवाह स्थळाकडे जातानाचा एक व्हिडीओ दिसत आहे. अवघ्या 30 सेकंदांच्या व्हिडीओत वधू अतिशय आनंदात दिसत असून ती काळ्या रंगाचा गॉगल घालून एका कारच्या सनरुपमधून बाहेर आली आहे. बाजूचे नातेवाईक गाण्यांवर नाचत असल्याने वधूनेदेखील ठेका धरला आहे. व्हिडीओच्या शेवटच्या काही सेकंदात वधूच्या डाव्या बाजूला मोठा आवाज होतो. एक भरधाव वाहन तिच्या शेजारी असलेल्या व्यक्तीला धडक देऊन पसार होते. वाहनाचा वेग जास्त असल्याने ते वाहन नेमक कोणत होते हे देखील व्हिडीओतून समजत नाही. पण त्या वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेने वधू शेजारील काही व्यक्ती अक्षरश: हवेत उडालेले दिसून येतात. सुदैवान भरधाव वाहनांने कारला धडक दिली नाही. त्यामुळे वधूला कोणतीही इजा झाली नाही.