आता ‘गुगल’ मॅपवर शोधू शकणार सार्वजनिक ‘शौचालय’, देशातील ४५ हजार शौचालयांच्या समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता तुम्ही गुगल मॅपवर तुमच्या जवळ असलेले शौचालय काही मिनिटात शोधू शकणार आहे. देशात प्रवास करताना किंवा बाहेर कुठे गेल्यास सर्वात मोठी समस्या असती ती म्हणजे गरज भासल्यास सार्वजनिक शौचालय शोधणे. परंतू ती चिंता आता मिटणार आहे. गुगल मॅपने ४५ हजार कम्युनिटी आणि सार्वजनिक शौचालयांच्या सहभाग केला आहे. केंद्र सरकारने लू रिव्यू अभियान अंतर्गत हे सार्वजनिक शौचालय झोडण्यात आले आहे.

घर आणि शहरी प्रकरण मंत्रालयने सप्टेंबर २०१८ मध्ये लू रिव्यू अभियानांअंतर्गत गूगलच्या सहाय्याने सुरुवात केली आहे. जेणे करुन भारतातील सर्व स्थानिक गाईड गुगल मॅपवर सार्वजनिक शौचालयांचे रेटिंग आणि रिव्यू टाकू शकतील.

४५ हजार शौचालयांच्या समावेश
५ जुलैला अर्थ संकल्पात भाषण देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आकडेवारी सांगताना सांगिलते होते की, टॉयलेट लोकेटर फिचरने अ‍ॅप आधिक विस्तृत झाले आहे. अ‍ॅप मध्ये भारतातील १७०० शहरातील ४५ हजार शौचालयांचा समावेश करण्यात आला आहे. असे असले तरी केंद्र सरकारने ग्रामीण भागातील शौचालयांचा समावेश करण्यात आला आहे.

या अंतर्गत नागरिकांना गूगल मॅपवरच नाही तर गुगलच्या इतर अ‍ॅपवरुन देखील शहरातील शौचालये शोधू शकणार आहेत. या आभियांनाचा उद्देश्य सर्व नागरिकांना आपल्या शहरातील शौचालये गूगल मॅपवर, गुगल सर्च आणि असिस्टेंटवर शोधू शकतील आणि वापरा नंतर प्रतिक्रिया देखील देऊ शकतील. शहरातील नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या