प्रदीप शर्मांचा प्रचार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर FIR

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन – एन्काऊंट स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला. प्रदीप शर्मा हे शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रदीप शर्मा यांचा सोशल मीडियावर प्रचार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला एखाद्या उमेदवाराचा प्रचार करता येत नाही. असे असतानाही पोलीस उपनिरीक्षकाने प्रदीप शर्मा यांचा प्रचार केला. हितेंद्र विचारे असे गुन्हा दखल करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तर पोलीस नाईक शिवाजी पालवे यांनी तुलिंज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे हे वसई स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असून त्यांची निवडणुकीपूर्वी पालघरच्या कल्याण शाखेत बदली झाली आहे. मात्र, त्या ठिकाणी हजर न होता ते मेडिकल रजेवर गेले. दरम्यान, प्रदीप शर्मा यांनी 15 ऑक्टोबर रोजी विरार येथील पूर्व फुलवाडा परिसरामध्ये रॅली काढली होती. यासाठी भाजपचे विद्यमान खासदार सत्यपाल सिंह हे प्रदीप शर्मा यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी हितेंद्र विचारे यांनी सत्यपाल सिंह यांच्या भेटीचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता. तसेच त्यांनी प्रदीप शर्मा यांनी केलल्या कामाची माहिती शेअर केली होती.

हितेंद्र विचारे यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. कोणत्याही शासकीय सेवेत कार्यरत असताना राजकीय उमेदवारासोबत फोटो काढणे किंवा त्याची माहिती सोशल मीडियावर न टाकणे हे कायद्याने बंधनकारक आहे. असे असतानाही हितेंद्र विचारे यांनी सत्यपाल सिंह यांच्या सोबतचा फोटो शेअर करून प्रदीप शर्मा यांच्या कामाची माहिती शेअर केली. त्यामुळे विचारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तुलिंज पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी