सावधान ! ‘Camscanner’ मध्ये खतरनाक ‘व्हायरस’, तात्काळ ‘डिलिट’ करा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – गुगल प्ले स्टोेेअरवर सतत फेक अ‍ॅप संबंधित यादी समोर येत आहे आणि आता यातील अशा एक अ‍ॅपमध्ये व्हायरस आढळला आहे, जे यूजर्सच्या अत्यंत पसंतीचे आहे. हे अ‍ॅप आहे ‘कॅम स्कॅनर’ अ‍ॅप. या अ‍ॅपमध्ये व्हायरस डिटेक्ट करण्यात आला आहे. सायबर सिक्युरिटी कॅसपर्सस्कीने यूजर्सला चेतावनी म्हणून ब्लॉग पोस्ट केला आहे.

रिसर्चर्सला अ‍ॅपच्या लेटेस्ट वर्जन मध्ये मॅलिशस मॉड्यूल Trojan.Dropper.AndroidOS.Necro.n आढळले. ड्रॉपर डिवाइसमधून कोणत्याही परवानगी शिवाय मालवेअर इंस्टॉल करते, जे बॅकिंगची माहिती चोरतात. फेक जाहिरातींवर क्लिक केल्यानंतर हे व्हायरस अ‍ॅक्टीव होतात. रिसर्चर्सच्या मते यासाठीच हा व्हायरस तयार करण्यात आला आहे.

अ‍ॅपच्या नव्या वर्जनमध्ये हे मालवेअर आढळले आहे आणि गुगलला याची माहिती दिल्यानंतर हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवरुन काढून टाकण्यात आले आहे.

या रिपोर्टनंतर CamScanner चे लेटेस्ट वर्जन गुगल प्ले स्टोरमधून काढून टाकण्यात आले परंतू त्याचे अनेक जूने वर्जन उपलब्ध आहेत. त्यात काहीमध्ये व्हायरस आहे तर काहीमध्ये नाही. व्हायरसपासून वाचण्यासाठी हे अ‍ॅप लगेचच uninstall करावे असे आवाहन करण्यात आले आहे. हे अ‍ॅप अत्यंत प्रसिद्ध आहे, हे 10 कोटी पेक्षा अधिक लोकांना डाऊनलोड केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –