संमतीने विवाह केलेली अल्पवयीन मुलगी पतीसोबत राहू शकते का ?, उच्च न्यायालयानं काय निकाल दिला ‘हे’ वाचा

अलाहाबाद : वृत्तसंस्था – अल्पवयीन मुलीने तिच्या संमतीने विवाह केला असला तरी ती मुलगी तिच्या पतीकडे राहू शकत नाही, असा महत्त्वाचा निकाल अलहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देताना न्यायालयाने असेही म्हटले आहे की, ती सज्ञान झाल्यानंतर तीने हा विवाह पुढे टिकवायचा की वेगळे होऊन तिला आवडेल त्याच्या सोबत आयुष्य व्यतीत करायचे याचा निर्णय घेण्याचे तिला स्वातंत्र्य आहे. असे खंडपीठाने स्पष्ट केलं.

संमतीने विवाह केलेल्या मुलीला तिच्या पतीसमवेत राहण्याची मुभा देणारा निर्णय हापूर न्यायालयाने दिला होता. त्या विरोधात या मुलीच्या वडीलांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. हारपुर येथील पिंटू नावाच्या व्यक्तीने त्यांच्या मुलीशी विवाह केला होता. विवाह केला त्यावेळी त्या मुलीचे वय 16 असल्याचे वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी न्यायालयात उपस्थित असणाऱ्या मुलीने आपण स्वत:च्या इच्छेने पिंटूसोबत विवाह केल्याचे न्यायालयात सांगितले. तसेच आपल्याला आपल्या पालकांसोबत रहायचे नसल्याचे सांगितले. कायद्यानुसार हा विवाह बेकायदा असल्याने सज्ञान झाल्यावर या मुलीने स्वत: ठरवावे की हा विवाह कायम ठेवायचा कि पर्याय निवडायचा, असे न्यायालयाने म्हटले. तसेच राज्य सरकारने ती सज्ञान होईपर्यंत तिच्या निवासाची व्यवस्था करावी. हारपूरच्या जिल्हा न्यायधिशांनी महिला न्यायिक अधिकाऱ्याची नियुक्ती करुन मुलीची दर महिन्याला खात्री खुशाली विचारावी, असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत.