Coronavirus : काय हवामान बदलल्यानं आणि पाऊस झाल्यानं कोरोनाचा वेग मंदावतो? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सोशल मीडियावर एका वायरल पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हवामान बदलल्याने आणि पाऊस पडल्याने कोरोना संसर्गाचा वेग कमी होईल. परंतु या पोस्टमध्ये कोणतीही सत्यता नाही. पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे की, हा दावा चुकीचा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि असे बनावट मेसेज शेयर करून संभ्रम पसरवू नये.

पीआयबी फॅक्ट चेकने हे सुद्धा म्हटले की, कोरोना संसर्गाचा वेग थांबू शकतो. जर तुम्ही योग्य प्रकारे मास्क वापरला. सामाजिक अंतराचे पालन केले आणि वारंवार हात धुणे आणि सॅनिटायजर वापरले.

कोरोना संसर्गाच्या सुरुवातीपासून सोशल मीडियावर अनेक प्रकारचे चुकीचे दावे केले जात आहेत. अशाच प्रकारचा दावा कोरोनाची पहिली लाट सुरू असताना करण्यात आला होता की, उन्हाळा सुरू होताच व्हायरस नष्ट होईल. परंतु, असे झाले नाही. व्हायरसचा वेग पहिल्यापेक्षा जास्त वाढला. नंतर थंडीच्या काळात सुद्धा व्हायरसचा कहर सुरूच राहिला. यासाठी हवामान बदलाचा व्हायरसवर कोणताही परिणाम होत नाही. यास तोंड देण्यासाठी योग्य ती खबरदारी आणि कोविड नियमांचे पालन केले पाहिजे.

होमियोपॅथी औषधाने ऑक्सीजनची कमतरता होणार नाही ?
पीआयबी फॅक्ट चेकने सोशल मीडियावर होमियोपॅथीच्या औषधाबाबत करण्यात येणारा दावा सुद्धा खोटा असल्याचे सांगितले. दावा करण्यात आला होता की कार्बो व्हेजिटेबील्स नावाच्या एका होमियोपॅथी औषधाच्या 2-3 थेंबाने शरीरातील ऑक्सीजनची मात्रा पूर्ण होऊ शकते. पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले, हा दावा बनावट आहे. श्वास घेण्यास त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.