लस घेतल्यानंतर मद्यपान किंवा धूम्रपान करू शकतो? 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी विशेष अहवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुरुवारपासून देशात कोविड – 19 लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. देशात बुधवार पर्यंत एकूण 6.4 कोटी लोकांना लसीचा डोस मिळाला होता. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाईन वर्कर, तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त किंवा 45 वर्षावरील गंभीर आजाराने ग्रस्त लोकांना लस टोचविण्यात आली. परंतु, गुरुवारपासून 45 वर्षांवरील प्रत्येक नागरिकासाठी लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, लस घेतल्यानंतर खाण्या – पिण्यात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याबाबत प्रश उपस्थित होत आहेत. मुख्यतः जे लोक मद्यपान करतात किंवा धूम्रपान करतात किंवा नॉनवेजचे शौकीन आहेत त्यांना काही दिवस या सर्व गोष्टी टाळाव्या लागणार का?

वैज्ञानिक आधाराशिवाय केले जातायेत दावे
एक अहवालात लस संदर्भात लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी अनेकांच्या मनात गैरसमजही दिसू आले. उदाहरणार्थ, तमिळनाडूच्या चेंगलपट्टू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम लस डोस घेणाऱ्या 60 वर्षीय शेतकरी राजेंद्रन म्हणाले की, त्यांना सेंटरवर सल्ला देण्यात आला कि, दुसर्‍या डोसच्या एक आठवड्यापूर्वी मद्यपान करू नये. मला सांगण्यात आले की मी दारू पिल्यास लस काम करणार नाही.’ त्याचप्रमाणे, चेन्नईतील कल्याणमधील एका पत्रकाराने दावा केला की, लस मिळाल्यानंतर 48 तास आपण मद्यपान, धूम्रपान किंवा मासे खाणे टाळावे असे परिचारिकाने त्यांना सांगितले. तर, एका मोठ्या खासगी रुग्णालयात त्याच्या मित्राला असा सल्ला देण्यात आला की, एका आठवड्यापर्यंत मद्यपान किंवा “नॉन-व्हेज ” करणे टाळावे. मात्र, ही तथ्य कोणत्याही संशोधनावर आधारित आहेत का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.

सरकारकडून नाही देण्यात आला कोणताही सल्ला
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आतापर्यंत सरकारने खाण्या-पिण्यावर बंदीचा सल्ला दिला नाही. तामिळनाडूचे आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन यांच्या म्हणण्यानुसार, “मांसाहार केल्याने लस निष्प्रभावी होते असा कोणताही शास्त्रीय अभ्यास झाला नाही.” त्यामुळे लोकांना लसीकरणासाठी मांस सोडण्याची गरज नाही. ‘ त्याचप्रमाणे, असा कोणताही वैज्ञानिक अभ्यास नाही की मद्यपान किंवा धूम्रपान केल्याने लसीकरणावर काही परिणाम होतो. मात्र याचा अर्थ असा नाही की लोकांनी कोरोना लस घेतल्यानंतर आनंदात मद्यपान केले पाहिजे. लसीकरणानंतर लोकांना बर्‍याचदा सामान्य फ्लू किंवा ताप, सर्दी, डोकेदुखी आणि उलट्या यासारख्या लक्षणांचा धोका असतो.

अशा परिस्थितीत मद्यपान केल्याने आरोग्य बिघडू शकते. कोविड – 19 विरुद्ध राज्याचे विशेष टास्क फोर्सचे ज्येष्ठ महामारीशास्त्रज्ञ आणि सदस्य डॉ. पी. कुगानंथम यांच्या मते, “अल्कोहोलमुळे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होतो आणि जास्त मद्यपान केल्याने लसही काम करू शकत नाही. जर एखादी व्यक्तीने लस घेण्याच्या एका आठवड्यापूर्वी आणि नंतर मद्यपान आणि धूम्रपान केले नाही तर त्याला बरे वाटू शकते.’ हे धूम्रपान करणाऱ्याला देखील होते.

या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक
डॉ. कुगानंथमच्या मते वैज्ञानिक दृष्टिकोनातून, लस घेण्यापूर्वी आणि नंतर, थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जे लोक स्टिरॉइड्स आणि ब्लड थिनर्सवर आहेत त्यांनी अधिक दुष्परिणाम टाळण्यासाठी लसीकरण आधी आणि नंतर दोन दिवस आधी अशी औषधे घेणे टाळले पाहिजे. जर एखाद्याला लसीपूर्वी अधिक आघात झाला तर त्यांनी डॉक्टरांना हे सांगावे आणि अधिक काळजी घ्यावी. ते म्हणाले आहेत की ही लस लागू झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे.