कांदा करेल धमन्यांमध्ये वाढलेलं कॉलेस्ट्रॉल कमी, ‘हे’ आहेत 8 खास फायदे, ’असा’ करा वापर

पोलीसनामा ऑनलाईन – हृदयासंबंधी समस्या, हार्ट स्टोक, हार्ट अटॅकची समस्या वाढण्याचे कारण म्हणजे शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढणे होय. चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार यामुळे अनेकदा कॉलेस्ट्रॉल वाढतं. घरात उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचा वापर करून कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येऊ शकते. यामुळे हृदयरोगांना दूर ठेवणे सहज शक्य होते. स्वयंपाकात घरात वापरला जाणारा कांदा सुद्धा यावर लाभदायक आहे. सॅलेडमध्ये किंवा तोंडी लावण्यासाठी कांद्याचे सेवन करू शकता. कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासह कांद्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात…

ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित शोधानुसार कांद्यात फ्लेवोनॉईड्स कमी घनत्व असणारे वाले लिपोप्रोटीन (एलडीएल), लठ्ठ लोकांमधील कॉलेस्ट्रॉल कमी करू शकतात. फूड एंड फंक्शन जर्नलमध्ये प्रकाशित माहितीनुसार हृदयरोग दूर ठेवण्यासाठी कांदयाचे सेवन करावे. कांद्याची कोणतीही एलर्जी किंवा रिअ‍ॅक्शन होत असल्यास अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हे आहेत फायदे

1 कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवली जाऊ शकते.
2 आजारांशी लढण्याची क्षमता वाढते.
3 शरीरात व्हिटॉमिन सी चे प्रमाण वाढते.
4 मधुमेहांच्या रुग्णांसाठी सुद्धा कांद्याचे सेवन करावे.
5 पचनक्रिया व्यवस्थित राहते.
6 कांदा रक्त शुध्द करण्याचे कार्य करतो.
7 व्हायरसशी लढण्यासाठी फायदेशीर ठरतात.
8 कांद्याच्या गरम रसाने पायांच्या तळव्यांना मालिश केल्यास पायांना आराम मिळतो.