धमन्यांमध्ये वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रभावी ठरतो कांदा ! ‘असा’ करा वापर

पोलीसनामा ऑनलाइन – जर शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढलं तर अनेक हृदयासंबंधी समस्या उद्भवतात. हार्ट अटॅकचीही समस्या वाढते. कोलेस्ट्रॉल वाढून नये यासाठी कांद्याचा वापर कसा फायदेशीर ठरतो याची आज आपण माहिती घेणार आहोत.

हेल्दी कोलेस्ट्रॉल – कांद्याच्या सेवनानं आजारांसोबत लढण्याची क्षमता वाढते. कारण यात फ्लेवोनोईड्स आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. यातील पोषक घटकांमुळं कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवली जाऊ शकते. यात असणाऱ्या फायटोकेमिकलमुळं शरीरात व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढतं.

अनेक रोगांपासून दूर राहण्यासाठी कांदा फायदेशीर ठरतो. यामुळं रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. मधुमेहांच्या रुग्णांसाठी कांद्याच्या सेवनाचा फायदा होतो. कांद्यात असे गुण असतात ज्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.

काय आहेत फायदे ?

1) पनक्रिया सुरळीत राहते.

2) कांद्यात फॉस्फरस अॅसिड असतं जे रक्त शुद्ध करण्याचं काम करतं.

3) यात असणाऱ्या अँटी बॅक्टेरियल गुणधर्मांमुळं व्हायरससोबत लढण्यासाठीही फायदा होतो.

4) कांद्याच्या गरम रसानं पायांच्या तळव्यांची मालिश केली तर पायांना आराम मिळतो.

महत्त्वाचं काही
कांदा तुम्ही सॅलडमध्येही खावू शकता. ब्रिटीश जर्नल ऑफ न्युट्रिशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या शोधानुसार, कांद्यात फ्लेवोनॉईड्स कमी घनत्व असणारे लिपोप्रोटीन (एलडीएल) लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांमधील कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.