हेमंत करकरेंनी साध्वी प्रज्ञा सिंग यांचा छळ केला : RSS नेत्याचा खळबळजनक आरोप

भोपाळ : वृत्तसंस्था – महाराष्ट्र राज्य दहशतवादीविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांचा छळ केला. त्यांनी अशा प्रकारे लोकांचा छळ करून चूक केली असल्याच आरोप आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांनी केला आहे. तसेच प्रज्ञा सिंह यांनी करकरेंबद्दल केलेले वक्तव्य मागे घतेले हा त्यांचा मोठेपणा असल्याचे देखील कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

हेमंत करकरे हे २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झाले. त्यामुळे आम्हाला त्यांच्या प्रति आदर आहे. त्यावेळी काँग्रसने या संस्थांचा गैरवापर करत एका महिलेचा छळ केला. भगवा दहशतवाद्याच्या नावाखाली हा कट रचण्यात आला होता. असा आरोप त्यांनी काँग्रेसवर करत साध्वी प्रज्ञा सिंग यांची बाजू घेतली.

काय म्हणाल्या होत्या प्रज्ञा सिंग

“हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरं जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल का. यावर मी म्हटलं की तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले”, असे वादग्रस्त विधान साध्वींनी केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like