‘या’ अभिनेत्रीनं BJP ला ठोकला ‘रामराम’, म्हणाली – ‘ज्या पक्षात अनुराग ठाकुर आणि कपिल मिश्रा असतील तिथं नाही राहू शकत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर पूर्व दिल्लीमध्ये सीएए आंदोलनादरम्यान हिंसा भडकली होती, ज्यात 40 लोकांचा जीव गेला होता. या दरम्यान 2013 साली भाजपात प्रवेश करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीने भाजपला रामराम ठोकला आहे. सुभद्रा मुखर्जी या अभिनेत्रीने अनेक सिनेमा, टीव्ही सिरियलमधून काम केले आहे, ज्यात कोथा कोऊ, सधारण मेये, खिलाडी, रोमियो अ‍ॅण्ड ज्यूलियटचा समावेश आहे. भाजप सोडण्याच्या निर्णयावर बोलताना त्या म्हणाल्या की बराच विचार करुन मी हे पाऊल उचलले आहे.

मुखर्जी म्हणाल्या की, मी 2013 साली भाजपात प्रवेश केला होता. मी पक्षाच्या कामामुळे प्रभावित होते परंतु काही वर्षांनी मी अनुभवले की बरंच काही चांगले चाललेले नाही. मी अनुभवले की लोकांमध्ये धर्माच्या आधारे घृणा पसरवणे त्यांचे मत तयार करणे भाजपच्या विचारधारेवर स्वार झाले आहे. यावर अनेकदा विचार केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री म्हणाल्या की, त्यांनी बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांच्याकडे राजीनामा सोपावला आहे.

अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा यांच्या भाषणावर उपस्थित केले सवाल –
अभिनेत्री मुखर्जी म्हणाल्या की, पहा दिल्लीत काय होत आहे, अनेक लोकांचा मृत्यू होत आहे अनेक घरांना आगीच्या हवाले केले जाते आहे. दंग्यामुळे लोक विभागले जात आहेत. पक्षाचे नेते अनुराग ठाकूर आणि कपिल मिश्रा यांच्या भडकाऊ भाषणांविरोधात कोणतीही कारवाई केली गेली नाही. काय होत आहे. हिंसाचाराच्या या दृश्याने माझे मन हेलावून गेले. मला वाटते त्यांना पक्षात ठेवायला नको. अशा पक्षापासून मी दूर राहणं पसंत करेल ज्यात पक्षात ठाकूर आणि मिश्रा यांच्यासारखे लोक आहेत.

सीएएवर बोलल्या मुखर्जी –
सीएएवर बोलताना मुखर्जी म्हणाल्या की, शेजारील देशातील जे नागरिक त्रस्त आहेत त्यांना नागरिकत्व देण्याचा निर्णय चांगला आहे, परंतु त्यांना नागरिकत्व देण्याच्या नावे भारतीयांच्या जीवांशी खेळले जात आहे. आपल्याला असे अचानक आपले नागरिकत्व सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. मी या निर्णयाचा निषेध करते. मला वाटते की मानवतेची हत्या करुन असुरांना जन्म दिला जात आहे. यामुळे लोकांच्या मानता असुरक्षितता निर्माण होईल. यामुळे फक्त दिल्लीत नाही तर संपूर्ण भारतात शांततेचा भंग होईल.