Coronavirus : ‘कोरोना’च्या जुन्या रूग्णांना सुद्धा सोडत नाही नवा स्ट्रेन, अँटीबॉडी सुद्धा फेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या स्ट्रेनबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत की, जे लोक अगोदरच संक्रमित झाले होते, त्यांना पुन्हा कोरोना व्हायरस प्रभावित करू शकतो. सामान्यपणे आतापर्यंत असे समजले जात होते की, एकदा कोरोना झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात जी अँटीबॉडी तयार होते ती दुसर्‍यांदा संक्रमित होण्यापासून रोखते. परंतु, हे कोरोनाच्या दुसर्‍या स्ट्रेनमध्ये सुद्धा शक्य आहे का? आता याचे उत्तर मिळाले आहे.

शास्त्रज्ञांना रिसर्चमध्ये आढळले की, जे लोक एकदा कोरोना झाल्यानंतर त्यामधून बरे झाले आहेत ते याच्या दुसर्‍या स्ट्रेनमुळे संक्रमित होऊ शकतात. यामागे शास्त्रज्ञांनी कारण सांगितले आहे की, सार्स-कोव्ह-2 व्हायरसने संक्रमित झाल्यानंतर शरीरात जी अँटीबॉडी तयार होते ती रक्तात 5-6 महिन्यापर्यंत सक्रिय राहते. या दरम्यान कोरोना व्हायरसने शरीरात प्रवेश केल्यास अँटीबॉडीमध्ये असलेले प्रोटीन त्यास प्रभावहिन करतात, ज्यामुळे तो शरीरात पसरू शकत नाही.

शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमध्ये असे होत नाही. कोरोनाचा नवा स्ट्रेन शरीरातील अँटीबॉडीच्या प्रोटीनमध्ये असलेल्या स्पाइकला न्यूट्रीलाइज करण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित करून घेतो, जी अँटीबॉडीच्या प्रतिक्रिया देण्याच्या क्षमतेला प्रभावित करते. याच कारणामुळे जे लोक कोरोनातून एकदा बरे झाले आहेत त्यांच्या शरीरात अँटीबॉडी असूनही व्हायरसच्या दुसर्‍या स्ट्रेनने संक्रमित होऊ शकतात.

शास्त्रज्ञांनी यावर केलेल्या रिसर्चबाबत सांगितले की, आमच्या चाचणीत अर्ध्या लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांवरून समजले की, शरीरात असलेली अँटीबॉडी नव्या स्ट्रेनविरूद्ध प्रतिक्रिया देण्याची क्षमता गमावते. यावरून समजते की, त्यांना आता पुन्हा संक्रमित होण्यापासून वाचवता येऊ शकत नाही. तर टेस्टमध्ये सहभागी अन्य लोकांच्या रक्तात आढळले की, अँटीबॉडीचा स्तर कमी झाला होता.

शास्त्रज्ञांनी इशारा जारी केला आहे की, जे लोक अगोदर कोरोना संक्रमित झाले आहेत, त्यांना पुन्हा संसर्ग होण्यापासून वाचण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांचे पालन करावे लागेल. मास्क घालावा लागेल आणि हात नियमित धुवावे लागतील. अशी काळजी घेऊनच ते नव्या स्ट्रेनपासून वाचू शकतात. हा दावा दक्षिण अफ्रीकेच्या राष्ट्रीय संसर्गजन्य रोग आरोग्य संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. ही संस्था सूक्ष्मजीव शास्त्र, विषाणु शास्त्र, महामारी शास्त्र, देखरेख आणि सार्वजनिक आरोग्य संशोधनाच्या क्षेत्रात काम करते.