भांगेपासून तयार केलं ‘कोरोना’वरील औषध ! भारतातही होणार ट्रायल ?

पोलीसनामा ऑनलाइन – अकसीरा फार्मा या कॅनडाच्या कंपनीनं कॅनाबिस म्हणजेच भांगेपासून कोरोना व्हायरस वरील औषध बनवल्याचा दावा केला आहे. कॅनाबिडियोल नावाचं हे औषध आहे. या औषधाचे दुष्परिणामही होत नसल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. कोरोनामुळं होणाऱ्या हृदयासंबंधित आजारापासून हे औषध संरक्षण देईल असंही कंपनीनं सांगितलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार कॅनेडियन औषध कंपनीच्या मते भांगेपासून तयार केलेल्या या औषधात सायको ॲक्टीव्ह गुणधर्म असतात. यामुळं शरीरात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो.

संशोधनात असं दिसून आलं आहे की, कोरोना संक्रमितांना एरिथमिया हा हृदयाचा आजार होतो. यामुळं हृदयाचे ठोके अनियमित होतात. जर एरिथमियाचे वेळेत निदान आणि उपचार झाले नाही तर यामुळं हार्ट अटॅकचा धोका असतो.

कंपनीनं असा दावा केला आहे की, त्यांनी बनवलेलं औषध हे अँटीव्हायरल गुणधर्म असणारं आहे. त्यामुळं हे औषध कोरोनाव्हायरसवरील उपचारासाठी सक्षम आहे. ब्रिटीश जर्नल ऑफ फार्माकोलॉजीमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.