Coronavirus : महिलेचं दुध ‘पाश्चरायझ’ केल्यानं निष्क्रिय होतो ‘कोरोना’ व्हायरस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आतापर्यंत, कोरोना विषाणूच्या संसर्गाबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे अद्याप मिळालेली नाही. वैज्ञानिक कोविड – 19 विषयी अधिकाधिक माहिती सतत गोळा करत असतात. दरम्यान, एका अभ्यासात असा दावा केला गेला आहे की, महिलेच्या दुधावर 62.5 डिग्री सेल्सियसवर 30 मिनिटापर्यंत पाश्चर केल्याने कोरोना विषाणू निष्क्रिय होतो. यानंतर दूध नवजात मुलांच्या वापरासाठी सुरक्षित होते.

कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, कोविड – 19 ने संक्रमित महिलांना सध्या सल्ला आहे कि, त्यांनी आपल्या नवजात मुलाचे स्तनपान चालू ठेवावे. कॅनडा मध्ये मानक देखभाल अंतर्गत खुप कमी वजनाने जन्मलेल्या मुलांना महिलेचे पाश्चर दूध दिले जाते. जोपर्यंत त्याच्या स्वत:च्या आईचा दुधाचा पुरवठा पुरेसा होत नाही. कॅनडाच्या टोरंटो युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर शेरॉन उंगर म्हणाले, “जर एखादी कोविड – 19 संक्रमित महिला आपले दूध दान करते, ज्यात व्हायरस आहे, तर पाश्चरायझेशनच्या या पद्धतीने दूध वापरासाठी सुरक्षित होते.” संशोधकांनी म्हंटले आहे कि, कॅनडाच्या सर्व दुध बँकांमध्ये होल्डर पद्धतीने 30 मिनिटांसाठी दूध 62.5 डिग्री सेल्सिअसवर तापवून पास्चराइज केले जाते.

दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1,24,30,659 प्रकरणे नोंदविली गेली आहेत. यामध्ये अलीकडेच प्रसूती झालेल्या महिलांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत नवजात मुलांना स्तनपान द्यायचे की नाही हा प्रश्न निर्माण झाला देत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत 5,58,324 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत संक्रमणाची सर्वाधिक 32,21,938 रुग्ण आहे. आतापर्यंत येथे 135,869 लोक मरण पावले आहेत.