पाहा Covid- 19 विषाणूचा B.1.1.7 व्हेरिएंटचा फोटो; भारतातील संसर्गाचं मुख्य कारण?

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   कोरोना विषाणूच्या संसर्गाबद्दल कॅनडातील वैज्ञानिकांनी कोव्हीड- 19 विषाणूच्या B.1.1.7 या अशा प्रकारचा संसर्ग विषाणूचा पहिला फोटो जारी करण्यात आला आहे. तर यावरून असते लक्षात येईल की, हा कोरोना विषाणू पूर्वीच्या विषाणूच्या प्रकारच्या तुलनेमध्ये जास्त संसर्गक का आहे? तसेच फक्त ब्रिटन देशात B.1.1.7 अशा प्रकारामुळे कोरोनामुळे संसर्गाचे अधिक प्रमाण वाढले नाहीतर भारत आणि कॅनडा या देशात देखील याचे प्रमाण जास्त आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मागील वर्षी डिसेंबर महिन्यात B.1.1.7 या विषाणूच्या प्रकाराच्या प्रथम रुग्णांची नोंद केली होती. म्हणून अधिक प्रमाणात बदल पाहायला मिळाला.

ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाने म्हटले आहे की, हा जारी केलेला फोटो परमाणु संकल्पवर काढण्यात आला आहे. B.1.1.7 व्हेरिएंट हा विषाणूचा प्रकार एवढा संसर्गक का आहे? सगळ्यात पहिला ब्रिटन देशात B.1.1.7हा व्हेरिएंट सापडला होता. आता कॅनडा देशातदेखील कोरोना विषाणूचे रुग्ण वाढण्यात व्हेरिएंट हे कारणीभूत आहे. असे प्रोफेसर डॉ. श्रीराम सुब्रमण्यम यांनी सांगितलं आहे. त्यांना कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमध्ये सापडणाऱ्या N501Y नावाच्या एका परिवर्तनमध्ये खासकरून इंटरेस्ट होता. विषाणूद्वारे व्यक्तीच्या शरीरात असलेल्या कोशिकांशी तो जुळतो आणि त्यांना संक्रमित करतो.

यासंदर्भात डॉ. सुब्रमण्यम सांगतात, आमच्याकडून घेण्यात आलेल्या फोटोत N501Y बदलाची प्रथम स्ट्रक्चरल झलक दिसते. यामधून असं लक्षात येत की, यांमधील बदल स्थानिक पातळीवर होतो. तर N501Y म्यूटेशन B.1.1.7 विषाणूच्या व्हेरिएंटमध्ये असलेलं एकच बदल आहे. यामध्ये स्पाइक प्रोटीनमध्ये आहे. यावरून व्यक्तीच्या शरीरामध्ये ACE2 रिसेप्टरबरोबर जुळतं. तसेच, संसर्ग आणि प्रोटीनच्या योग्य आकाराची माहिती मिळवण्यासाठी रिसर्च टीमने क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर केला. यातून हा व्हायरस V आकाराचा दिसला. ACE2 रिसेप्टर माणसांच्या शरीरातील कोशिकांच्या पृ्ष्ठभागावरील एक द्रव्य आहे. जे Sars-CoV-2 विषाणूसाठी प्रवेशासाठी कार्य करत असत. या दरम्यान, कोरोना विषाणू पिनेच्या टोकापेक्षा १ लाख पटीने जास्त लहान आहे आणि सामान्य मायक्रोस्कोपद्वारे याला ओळखणं अथवा पाहणं शक्य होणार नाही.